घरIPL 2020IPL 2020 : युवराज सिंग म्हणतो, 'बरं झालं राहुलनं तो एक बॉल...

IPL 2020 : युवराज सिंग म्हणतो, ‘बरं झालं राहुलनं तो एक बॉल चुकवला’!

Subscribe

कोरोना, सुशांत सिंह राजपूत, बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन या सगळ्या कोलाहलात सामान्यांचं मनोरंजन करण्यासाठी IPL चा तेरावा सीजन जालीम उपाय ठरतोय. आयपीएलमध्ये दररोज नवनव्या गोष्टी घडत असतात आणि त्याची चर्चा सोशल मीजियापासून गल्लीबोळातल्या चर्चासत्रांमध्ये होत असते. रविवारी KXIP vs RR या सामन्यानं क्रिकेट चाहत्यांचा रविवार खऱ्या अर्थानं मेगा संडे केला. दोन्हीकडच्या बॅट्समन्सनी केलेली तुफान फटकेबाजी चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी होती. मात्र, त्यातही सगळ्यांचं मन जिंकून गेली ती राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर राहुल तेवतियाची दणदणीत खेळी. या खेळीत तेवतियानं किंग्ज इलेव्हनच्या शेल्डन कॉट्रेलच्या एकाच ओव्हरमध्ये तब्बल ५ सिक्स तडकावले आणि तिकडे भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगच्या पोटात गलबलून आलं!

६ बॉल, ५ सिक्सर!

शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या १८व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियानं ५ सिक्सर ठोकले. यामध्ये पाचवा बॉल फक्त तेवतियानं मारला नाही. तो बॉल मिस झाला. नाहीतर तेवतियानं युवराज सिंगचं एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारल्याचं रेकॉर्ड तोडलं असतं. अर्थात, युवराज सिंगनं हे रेकॉर्ड वर्ल्डकपमध्ये भारताकडून केलं आहे. पण तेवतियानं आयपीएलमधला नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असता. यावर ट्वीट करत युवराज सिंग म्हणतो, ‘मिस्टर राहुल तेवतिया, ना भाई ना. तो एक बॉल मिस केल्याबद्दल धन्यवाद! या अविस्मरणीय विजयासाठी राजस्थान रॉयल्सचं अभिनंदन. मयांक अगरवाल आणि संजू सॅमसन यांनी देखील नेत्रदीपक खेळी केली!’

- Advertisement -

युवराज सिंगच्या या ट्वीटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही व्हायरल होऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राहुल तेवतियाच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -