मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा जेवढा क्रिकेटच्या मैदानातील त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत राहिला, तेवढाच तो मैदानाबाहेरही चर्चेत राहिला. चहलने 11 डिसेंबर 2020 मध्ये कोरिओग्राफर धनश्री वर्मा लग्नगाठ बांधली. पण गेल्या काही दिवसात त्यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले. काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवरून चहलचे आडनाव काढले होते. यावरून त्यांच्या घटस्फोटाच्या वावड्या उठल्या होत्या. पण त्यावेळी दोघांनीही असे काही नसल्याचे सांगत याला नकार दिला. पण पुन्हा एकदा आता त्यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. (Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce rumours Instagram photos deleted)
हेही वाचा : IND vs AUS Test : पंतची तुफानी खेळी तरीही…; दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची ही अवस्था
नुकतेच भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून धनश्री आणि त्याचे एकत्र असणारे सर्व फोटो काढल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. तसेच, त्यांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर या पॉवर कपलच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण अद्याप अधिकृतरीत्या त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे आता एक पब्लिसिटी स्टंट असल्याचेदेखील काही जणांचे म्हणणे आहे.
घटस्फोटाच्या चर्चा पहिल्यांदा नाही
भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या घटस्फोटाची चर्चा पहिल्यांदाच होत नाही. तर, यापूर्वीही अनेकदा त्यांच्यामध्ये काही वाद असल्याचे समोर आलेले आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असल्याने अनेक जण त्यांच्या पोस्टवर लक्ष ठेवून असतात. अनेक माध्यमांमधून हे समोर आले आहे की, घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहेत. दरम्यान, यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने 11 डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले होते. काही वर्ष त्यांच्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू असल्याची सोशल मीडियाच्या पोस्टवरून दिसत होते. पण 2023 मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून चहलचे आडनाव काढून टाकले. त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, त्यानंतर दोघांनीही या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते.