घरक्रीडाविश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला चीटिंग करून हरवले; Zerodha च्या संस्थापकावर बंदी

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला चीटिंग करून हरवले; Zerodha च्या संस्थापकावर बंदी

Subscribe

काही दिवसांपूर्वी आनंद आणि कामत यांच्यात बुद्धिबळाचा एक चॅरिटी सामना झाला.

भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला हरवणे भल्या-भल्या बुद्धिबळपटूंना जमत नाही. परंतु, झिरोधा (Zerodha) या आर्थिक सेवा देणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक निखिल कामतने विश्वनाथन आनंदला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. रविवारी आनंद आणि कामत यांच्यात बुद्धिबळाचा एक चॅरिटी सामना झाला. या सामन्यात कामतने आनंदला पराभवाचा धक्का दिला होता. परंतु, हा विजय मिळवण्यासाठी चीटिंग केल्याचे स्वतः कामतने मान्य केले. त्याने आनंदला पराभूत करण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घेतल्याचे कामत ट्विट करून म्हणाला. त्यामुळे त्याचे Chess.com वरील अकाऊंट बंद करण्यात आले आहे. या वेबसाईटवर जगभरातील बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध ऑनलाईन सामने खेळतात. परंतु, आता निखिल कामतवर बंदी घालण्यात आली आहे.

आनंद सरांचा पराभव करणे शक्य नाही

बुद्धिबळाच्या सामन्यात मी आनंद सरांचा पराभव केला, यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला आहे. परंतु, हे शक्य नाही. त्यांचा बुद्धिबळाच्या सामन्यात पराभव करणे, म्हणजे १०० मीटर शर्यतीत युसेन बोल्टचा पराभव करण्यासारखे आहे, असे निखिल कामत त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

- Advertisement -

तसेच मी आनंद सरांचा पराभव करण्यासाठी कॉम्प्युटरची आणि बुद्धिबळ या खेळातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतल्याचे कामत या ट्विटमध्ये म्हणाला. माझा हा सामना खेळून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न होता. मी केवळ मजेसाठी आणि चॅरिटी म्हणून हा सामना खेळलो. परंतु, माझ्या कृत्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला, त्यासाठी मी माफी मागतो, असेही त्याने या ट्विटमध्ये लिहिले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -