BAN Vs ZIM : षटक संपले म्हणून खेळाडू मैदानाबाहेर गेले, पण पंचांनी पुन्हा मैदानात बोलावले; वाचा नेमके काय घडले?

बांगलादेश आणि झिम्बॉब्वे यांच्यात आज अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने 3 धावांनी झिम्बॉब्वेवर विजय मिळवला. मुळात हा सामना झिम्बॉब्वेचाच होता, शिवाय 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयाची संधीही उपलब्ध झाली होती.

बांगलादेश आणि झिम्बॉब्वे यांच्यात आज अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने 3 धावांनी झिम्बॉब्वेवर विजय मिळवला. मुळात हा सामना झिम्बॉब्वेचाच होता, शिवाय 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयाची संधीही उपलब्ध झाली होती. मात्र ती संधी झिम्बॉब्वेने गमावली आणि अखेर बांगलादेशने हा सामना जिंकला. (Zim Vs Ban Bangladesh Zimbabwe Last Ball No Ball Umpire)

नेमके काय घडले सामन्यात?

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 150 धावांचे आव्हान झिम्बॉब्वे समोर ठेवले. 20 व्या षटकात 3 विकेट्स गमावल्याने बांगलादेशला 7 बाद 150 धावांवर समाधान मानावे लागले. बांगलादेशने दिलेल्या या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बॉब्वेच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही. तसेच, सामन्याच्या अखेरच्या षटकात झिम्बॉब्वेला विजयासाठी 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. त्यावेळी मोसाद्देक हुसेन हा 20वे षटक टाकत होता. त्यावेळी अखेरचा चेंडू मोसाद्देक हुसेन टाकला, पण या चेंडूवर बांगलादेशला धावा काढता आली नाही. उलट यष्टीरक्षक नुरुल हसन याने मुजारबानीला यष्टीचित करत बांग्लादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे बांग्लादेशी खेळाडूंनी विजयाचे सेलिब्रेशन केले आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाबाहेर गेले. मात्र अत्यंत अनपेक्षितरीत्या पंचांनी शेवटचा चेंडू नो बॉल घोषित केला.

बांग्लादेशी यष्टीरक्षक नुरुल हसन याने शेवटचा चेंडू स्टंपाच्या पुढे झेलत फलंदाजाला यष्टीचित केल्याने हा नो बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळे मैदानाबाहेर गेलेल्या खेळाडूंना पुन्हा बोलावण्यात आले. नो बॉल ठरल्याने झिम्बॉब्वेच्या खात्यात एक अतिरिक्त धाव जमा झाली आणि संघासमोर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांचे आव्हान राहिले. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर चौकार खेचत संघाला विजय मिळवून देण्याची संधी झिम्बॉब्वेच्या ब्लेसिंग मुजारबानी याच्यासमोर होती. मात्र पुन्हा एकदा तो शेवटच्या चेंडूवर धाव घेण्यास अपयशी झाला आणि झिम्बॉब्वेने 3 धावांनी हा सामना गमावला.


हेही वाचा – ZIM vs BAN : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 3 धावांनी विजय; आता पाकिस्तानचे लक्ष भारताकडे