घरक्रीडास्कॉटलंड विश्वचषकातून बाहेर; झिम्बाब्वेचा 6 गडी राखून विजय

स्कॉटलंड विश्वचषकातून बाहेर; झिम्बाब्वेचा 6 गडी राखून विजय

Subscribe

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी-20 विश्वचषकात प्रवेश मिळवला असून, स्कॉटलंडचा संघ विश्वचषकाबाहेर गेला आहे.

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी-20 विश्वचषकात प्रवेश मिळवला असून, स्कॉटलंडचा संघ विश्वचषकाबाहेर गेला आहे. त्यामुळे 6नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. (Zimbabwe defeated Scotland by 5 wickets IND vs ZIM will be played on 6th November)

सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघामध्ये लढत पार पडली. आज झालेल्या दोन्ही सामन्यांमुळे सुपर-12 मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राउंड फेरीमध्ये खेळलेल्या 8 संघांपैकी श्रीलंका, नेदरलॅंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या 4 संघाना विश्वचषकाचे तिकिट मिळाले आहे.

- Advertisement -

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडला चांगली फलंदाजी करता आली नाही. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुनसे व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुनसेने 51 चेंडूत 54 धावांची सावध खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर स्कॉटलंडच्या संघाने 20 षटकांत 6 बाद 132 धावा केल्या.

स्कॉटलंडने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 5 गडी राखून विजय मिळवला आणि विश्वचषकाचे तिकिट मिळवले. झिम्बाब्वेकडून तेंडाई चतारा आणि रिचर्ड नागरावा यांनी प्रत्येकी 2-2 बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुजरबानी आणि सिकंदर रझा यांना 1-1 बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

ग्रुप ए मधील संघ – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, आयर्लंड.

ग्रुप बी मधील संघ – भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलॅंड, झिम्बाब्वे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

  • 23 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर – भारत वि. नेदरलॅंड, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
  • 30 ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
  • 2 नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, ॲडलेड
  • 6 नोव्हेंबर – भारत वि. झिम्बाब्वे, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • 13 नोव्हेंबरला अंतिम सामना

हेही वाचा – टी-20 विश्वचषक : वेस्ट इंडिजचा संघ बाहेर; आयर्लंडचा 9 गडी राखून विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -