घरक्रीडाझाल्टान इब्राहिमोविचला पाठविले सामन्याबाहेर

झाल्टान इब्राहिमोविचला पाठविले सामन्याबाहेर

Subscribe

प्रतिस्पर्धी खेळाडू मायकल पेट्रासोला डोक्यावर मारल्याने मिळाले रेड कार्ड

मॉन्ट्रियल इम्पॅक्टविरुद्ध ला गॅलेक्सी या फूटबॉल सामन्यात ला गॅलेक्सीचा स्टार प्लेयर झल्तानला प्रतिस्पर्धी खेळाडूला डोक्यावर मारल्याने सामन्याबाहेर पाठविण्यात आले. मात्र या नंतरही हा सामना ला गॅलेक्सीने १-० अशा फरकाने जिंकला.
खेळ अतिशय रंजनात्मक पद्धतीने सुरु असताना मायकल पेट्रासो आणि झाल्टान दोघे एकमेकांना धडकून मैदानावर पडले. यानंतर रेफ्री इस्माइल यांनी रिव्हुय व्हिडिओ बघितल्यानंतर पेट्रासो याला यलो कार्ड दाखवत वॉर्निंग दिली, तर इब्राहिमोविच याला रेड कार्ड देत बाहेरचा रस्ता दाखविला. यानंतर चुरशीच्या झालेल्या या सामन्यात ७५व्या मिनिटाला ला गॅलेक्सीच्या ओला कमारा याने गोल मारत सामन्यात आपल्या संघाला पुढे नेले आणि सामना जिंकण्यास ला गॅलेक्सीला यश आले.
यापूर्वी देखील बऱ्याच अशा प्रसंगांना झाल्टान याला सामोरे जावे लागले आहे. आपल्या उत्कृष्ट खेळासाठी जगप्रसिद्ध असणारा झल्तान हा आपल्या रफ खेळासाठीही चांगलाच प्रसिद्ध आहे. ३६ वर्षीय झल्तान याने २०१६ साली झालेल्या युरो २०१६या स्पर्धेनंतर आंतराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतली. आपल्या अनोख्या खेळामुळे नेहमीच चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारा झाल्टान आपल्या बायसिकल किक साठी फार फेमस होता आपल्या उंच उंचीमुळे झाल्टान बायसिकल किक मारण्यात नेहमी यशस्वी व्हायचा. आपल्या उंचीमुळे पळण्यातील आणि खेळातील चपळाईमुळे झाल्टान नेहमी टॉप प्लेयर्स मध्ये मोजला जायचा. स्वीडनचा स्टार प्लेयर झाल्टान याने नुकतेच हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सध्या तो ला गॅलेक्सी या क्लबकडून खेळत असून, आंतरराष्ट्रीय फुटबालमधून निवृत्त झाल्याने यंदा रशिया येथे होणाऱ्या २०१८ च्या वर्ल्डकपमध्ये झाल्टान खेळणार नसल्याने त्याचे चाहते त्याला मिस करतील हे नक्की!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -