Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Bullet घेताय? तर जाणून घ्या Royal Enfiled Classic 350 ने आणलीय धमाकेदार...

Bullet घेताय? तर जाणून घ्या Royal Enfiled Classic 350 ने आणलीय धमाकेदार ऑफर

बाईकसाठी महिन्याला ४ हजार २८७ रुपयांचा EMI

Related Story

- Advertisement -

देशातील सर्वात दमदार बाईक कंपनी Royal Enfiled ने बुलेटसाठी धमाकेदार ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमधून Royal Enfiled ची प्रसिद्ध बाईक Royal Enfiled Classic 350 खरेदी करणे सोपे होणार आहे. जर Royal Enfiled Classic 350 खरेदी करणार असाल तर Royal Enfiled ची नवीन ऑफर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या नवीन ऑफरमधून Royal Enfiled Classic 350 ही बाईक केवळ २० हजार रुपये डाऊनपेमेंट करुन तुम्ही घरी आणू शकता. उरलेली रक्कम EMIच्या माध्यामातून भरु शकणार आहात. EMIसाठीही कंपनीने सवलत दिली आहे. बाईकसाठी महिन्याला ४ हजार २८७ रुपयांचा EMI भरता येणार आहे. जाणून घेऊया Royal Enfiledच्या या ऑफरविषयी. (20 thousand rs down payment offer brought by Royal Enfield Classic 350)

कंपनीने ३ ते ४ वर्षांचा EMI प्लॅन दिला आहे. Royal Enfiled Classic 350 खरेदी केल्यावर ३ वर्षांसाठी EMI करणार असाल तर त्यासाठी महिन्याला ६ हजार ५७ रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. तर ४ वर्षांसाठीचा EMI प्लॅन घेत असाल तर ४ हजार ९४१ रुपयाचा EMI द्यावा लागणार आहे आणि ५ वर्षांचा EMI प्लॅन घेत असाल तर त्यासाठी महिन्याला ४ हजार २८७ रुपयांचा EMI भरावा लागणार.

- Advertisement -

Royal Enfiled Classic 350 ही बाईक काही दिवसांपासून नवीन रुपात लाँच करण्यात आली. या नव्या मॉडेलमध्ये ३४६७cc क्षमता असलेले सिंगल सिलिंडर एअर युक्त कूल UCE इंजिन देण्यात आले आहे. या बाईकची सिंगल चॅनेल ABS वर्जनची किंमत १,६७,२३५ आहे. तर बाईकच्या ड्युअल चॅनल ABS ची किंमत कंपनीने १,७१,५७० रुपये इतकी ठेवली आहे.


हेही वाचा – केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे Twitter ला पडले महाग, कायदेशीर कारवाईला जावे लागणार सामोरे

- Advertisement -

 

- Advertisement -