Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक जबरदस्त बॅटरी बॅकअप, 48 MP कॅमेरा असणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच

जबरदस्त बॅटरी बॅकअप, 48 MP कॅमेरा असणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच

Related Story

- Advertisement -

टेकनो इंडियानेहमीच कमी किंमतीत आकर्षक फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात आणण्याचा प्रयत्न करत असते. यंदा कंपनीने TECNO SPARK 7T या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. TECNO SPARK 7T या स्मार्टफोन 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6000 एमएएचची जबरदस्त बॅटरी देखील देण्यात आली आहे. TECNO SPARK 7T चा कॅमेरा सर्व प्रोफेशनल मोडसह डिझाइन करण्यात आला आहे. TECNO SPARK 7T हा फोन एप्रिल महिन्यात लाँच झालेल्या Tecno Spark 7 चा व्हर्जन आहे. भारतात 7,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हा फोन लाँच करण्यात आला होता. टेक्नो स्पार्ट सीरीज ही कंपनीची भारतात सर्वाधिक विक्री होणारी सीरीज आहे. TECNO SPARK 7T या फोनची स्पर्धा रेडमी, मायक्रोमॅक्स, रिअलमी यासारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनशी असणार आहे. जाणून घ्या भारतातील सर्वात स्वस्त 48 मेगापिक्सेल कॅमेरा फोनची किंमत आणि त्याच्या सर्व फीचर्सबद्दल…

अशी असणार किंमत

TECNO SPARK 7T या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. या किंमतीत 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज उपलब्ध असणार आहे. फोनची विक्री 15 जूनपासून अॅमेझॉन इंडियावरून होणार आहे. लॉन्चिंग ऑफरअंतर्गत पहिल्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी हा फोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. फोन ज्वेल ब्लू, ऑरेंज आणि मॅग्नेट ब्लॅकमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

TECNO SPARK 7T फोनचे फीचर्स

- Advertisement -

या फोनमध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड HiOS v7.6 देण्यात आला आहे. याशिवाय यात 6.52 इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच आयपीएस डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. डिस्प्लेचा ब्राइटनेस 480 निट्स आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G35 प्रोसेसर, 4 जीबी DDR4x रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे, जो मेमरी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत युजर्सना वाढवता येणार आहे.

फोनने 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यावर 29 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच या फोनच्या बॅटरीसह पूर्ण चार्जिंग झाल्याचा देखील अलर्ट युजर्सना देण्यात येणार आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, त्यापैकी प्राइमरी लेन्स 48 मेगापिक्सेल आहेत, ज्याची अपर्चर f/ 1.8 आहे. दुसरे लेन्स व्हीजीए आणि तिसरे एआय लेन्स देण्यात आले आहेत. कॅमेर्‍यासह क्वाड फ्लॅश लाईटही देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -