घरटेक-वेक5G मुळे तुमच्या जीवनात होतील 'हे' बदल

5G मुळे तुमच्या जीवनात होतील ‘हे’ बदल

Subscribe

4G नंतर आता 5G टेक्नॉलॉजी भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. या टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेटचा वेग आनखी वाढणार आहे. सामान्य मानसाप्रमाणाचे उद्योगांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल.

बदलत्या काळाप्रमाणे इंटरनेटचा वापरही वाढत चालला आहे. आता पर्यंत आपण 4G इंटरनेट सेवेचा वापर करत होतो. काळाप्रमाणे इंटरनेटचा वेगही वाढणे आवश्यक असल्याने आता याची पुढची पिढी म्हणजेच 5G येत आहे. 5G टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेटचा वेग तक वाढेलच मात्र हा वेग मानवी जीवनावर कसा परिणाम करु शकतो याची संकल्पना केली जात आहे. भारतात याचा वापर येत्या काही वर्षात सुरू होईल. मात्र २०२२ पर्यंत भारतात सर्वत्र 5G इंटरनेट मिळावा अशा प्रयत्नात सरकार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांमार्फत 5G टेक्नॉलॉटी भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 5G प्रणाली इंटरनेटच्या वापराला पूर्ण पणे बदलून टाकेल.

कसा होईल 5G चा परिणाम

जगभरात केबल्सच्या सहाय्याने इंटरनेट पोहचवल्या जातात. हजारो किलोमीटर लांब असलेल्या या केबल्स समुद्रातून टाकण्यात आल्या आहेत. या केबल्समुळे आपण इंटरनेट वापरु शकतो. काही वर्षांपूर्वी 2G,3G आणि 4G अशा इंटरनेटच्या जनरेशन्स आपण वापरल्या. प्रत्येक जनरेशनबरोबर इंटरनेट अजून फास्ट होतो असे आपल्या दिसले. 4G नेटवर्कवर आपण चित्रपट,गाणी आणि मोठ्या आकाराच्या फाइल्स सहज शेअर करतो. 5G टेक्नॉलॉजीमुळे आपलेल्या एकाच वेळी लाखो डिव्हाईस कनेक्ट करता येतील. यामुळे सर्व सामान्यांना हायस्पीड इंटरनेटतर मिळेलच मात्र मोठ्या कंपन्यांनाही याचा फायदा होणार आहे. या शिवाय सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेकदा वेबसाईट्स बंद पडतात यावरही आळा बसण्याची शक्यता आहे. 5G स्पीड असल्यामुळे हे इंटरनेट कनेक्शन तुमच्या घरातील फ्रीज पासून सुरक्षेपर्यंत काम करणार आहे. 5G स्पीड वापरण्यासाठी मोबाईल फोनही 5G असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

किती असेल 5G चा स्पीड

4G नेटवर्कमध्ये इंटरनेटचा स्पीड हा 100MB/PS होता. याचाच अर्थ सेकंदाला १०० एमबी वापरु शकतो. मात्र 5G मध्ये हा स्पीड अजून वाढणार आहे. 5G नेटवर्कमध्ये हा स्पीड 20GB/PS येवढा असणार आहे. म्हणजेच २० जीबी प्रतीसेकंद येवढा असेल. या स्पीडमुळे गुगल मॅप,वाहनांवर लक्ष ठेवणे किंवा मोबाईलमधील इतर सेवांचे स्पीड वाढतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -