Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Project Udaan : AI तंत्रज्ञानाने इंजिनिअरींग पुस्तकांचे भाषांतर, IITB चा पुढाकार

Project Udaan : AI तंत्रज्ञानाने इंजिनिअरींग पुस्तकांचे भाषांतर, IITB चा पुढाकार

Related Story

- Advertisement -

उच्च शिक्षणात इंजिनिअरींग सोबतच मेन स्ट्रिमच्या विषयांसाठीची पुस्तके भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत करणारा प्रोजेक्ट उडान आज मंगळवारी आयआयटी मुंबईच्या टीमकडून लॉंच करण्यात आला. इंग्रजी पुस्तकांचे हिंदीसह भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून देणारा हा पर्याय विद्यार्थ्यांना अतिशय सोयीचा असा ठरणार आहे. १४ सप्टेंबर हिंदी दिवसाच्या निमित्ताने प्रोजेक्ट उडान लॉंच करण्यात आला. आयआयटी मुंबईचे डिपार्टमेंट ऑफ कन्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनी हा प्रकल्प लॉंच केला. या कार्यक्रमासाठी भारत सरकारसाठी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ कृष्णस्वामी यांची मुख्य अतिथी म्हणून हजेरी होती.

प्रोजेक्ट उडान हा डोनेशनवर आधारीत असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत एन्ड टू एन्ड अशी इकोसिस्टिम तयार करण्यात आली आहे. इंग्रजी भाषेतून हिंदी किंवा कोणत्याही भारतीय भाषांमध्ये हा सगळा मजकूर भाषांतरीत करण्याची सुविधा या प्रकल्पाअंतर्गत आहे. प्राध्यापक गणेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)वर आधारीत ट्रान्सलेशन इकोसिस्टिम तयार केली आहे. या सिस्टिममुळे इंजिनिअरींगची पुस्तके आणि लर्निंग मटेरिअल हे एक सष्टांश इतक्या कमी वेळात भाषांतरीत करणे शक्य आहे. जितका वेळ भाषा तज्ज्ञांना भाषांतरासाठी लागतो, त्यातुलनेत एक सष्टांष कमी वेळेत ही पुस्तके भाषांतरीत करणे शक्य होईल. येत्या काळात सर्व अभ्यासक्रमातील पुस्तके भाषांतरीत करणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

मानवी मदतीनेच मशीनच्या माध्यमातून भाषांतर हा आमचा प्रोजेक्ट उडान अंतर्गतचा उद्देश आहे, असे प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनी स्पष्ट केले. विविध टेक्निकल डोमेन्स भाषांतरीत करण्यात आले. द्विभाषिक डिक्शनरीचे डिजिटायजेशन करणे हे आव्हान असल्याचेही ते म्हणाले. आम्ही दुभाषिक अशा स्वरूपाचे OCR तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे आता डिजिटल अशा दुभाषिक डिक्शनरी या मशीन रिडेबल फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक अशा स्वरूपाच्या संज्ञा या इंग्रजीतून भाषांतरीत करणे शक्य होते. AI वर आधारीत ट्रान्सलेशन इंजिनमुळे एखादे टेक्निकल पुस्तक हे एक सष्टांश इतका वेळ कमी करत भाषांतरीत करणे शक्य आहे. एआय आणि एमएल इंजिनमुळे येत्या काळात प्रत्येक पान आणि प्रत्येक पुस्तक हे येत्या काळात कमी वेळेत भाषांतरीत करणे शक्य होणार आहे.

प्रोजेक्श उडान 

टेक्निकल माहिती ही हिंदी किंवा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नसल्यानेच सात वर्षांपूर्वी प्राध्यापक गणेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रोजेक्ट उडाणसाठी काम करण्याचे ठरविले. भारतीय संविधानानुसारच प्रत्येक राज्याची आणि स्थानिक यंत्रणेची प्रत्येक विद्यार्थ्याला तसचे अल्पसंख्यांक समुदायाला मातृभाषेत शिक्षण देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. भारताची स्वातंत्र्यानंतर कृषीप्रधान देश म्हणून असलेली ओळख कालांतराने शहरी आणि शहरीकरण होणारा देश अशी होऊ लागली. वेगाने शहरीकरण होणाऱ्या भारतात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. पण त्यासोबत सॉफ्टव्हेअर तंत्रज्ञानाची त्याच वेगाने मागणी वाढू लागली. कुशल कामगारांची गरज वाढतानाच इंग्रजीतील प्रभुत्वही महत्वाचे मानले जाऊ लागले. त्याचा परिणाम हा इंग्रजी भाषेतून शिक्षणाच्या मागणीवर होऊ लागला. पण या मागणीचा फायदा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या केवळ १० ते २० टक्के भारतीयांनाच झाला. त्यामुळेच ८० टक्के लोकसंख्या ही इंग्रजीतून शिक्षण मिळत असल्यानेच शिक्षणापासून वंचित राहिली. त्यामुळेच या वंचित राहिलेल्या ८० टक्के जनसमुदायाला वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची उपलब्धतता ही भारतीय भाषांमध्ये देणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रोजेक्ट उडानची सुरूवात झाली. हा संपुर्ण प्रकल्प निधीवर अवलंबून आहे. या प्रकल्पाअंतर्गत ५०० इंजिनिअरींग पुस्तकांचे भाषांतर हिंदीत केले जाणार आहे. तसेच १५ भारतीय भाषांमध्ये ही पुस्तके येत्या तीन वर्षात भाषांतरीत करण्यात येतील.


- Advertisement -

 

- Advertisement -