घरटेक-वेकJio ला टक्कर देत Airtelने आणला ४५६चा नवीन प्रीपेड प्लॅन

Jio ला टक्कर देत Airtelने आणला ४५६चा नवीन प्रीपेड प्लॅन

Subscribe

नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइज कॉल्स आणि १०० SMS देखील देण्यात आले आहेत.  

Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन धमाकेदार प्लॅन्स आणत असते. मात्र आता जिओला टक्कर देण्यासाठी Airtel देखील पुढे आले आहे. Airtelने Jio ला टक्कर देण्यासाठी ४४७ रुपयांचा प्लॅन आणला आहे. Jioने मागील आठवड्यातच त्यांचा ४४७ चा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ५० GB डेटा ६० दिवसांच्या वॅलिडिटीसहित देण्यात आला आहे. त्याचबरोबर या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइज कॉल्स आणि १०० SMS देखील देण्यात आले आहेत.  (Airtel has come up with a new prepaid plan of 456 against Jio)

एअरटेलच्या ४५६ रुपयांच्या या नव्या प्लॅनमध्ये Amazon Prime Video Mobile Edition, airtel Xstream Premium आणि Wynk Musicचे सबस्क्रिप्शन देखील देण्यात येणार आहे. हा प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर देखील लिस्ट करण्यात आला आहे. एअरटेलचा ४५६ रुपयांचा हा प्रीपेड प्लॉन Airtel Thanks App आणि इतर थर्ड पार्टी सोर्स असलेल्या गुगल, Paytm च्या माध्यमातूनही घेता येणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही काळापासून आपला फोनचा रिचार्ज संपल्यानंतर कॉल करणे बंद होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा रिचार्ज करावा लागतो. एअरटेलचा ४५६ चा प्रीपेड प्लॅन संपल्यानंतर प्रति Megabyte साठी ५० पैसे आकारण्यात येणार आहेत. एअरटेलच्या नवीन प्लॅनसोबत ३० दिवसांसाठीचे Amazon Prime Video Mobile Edition चे ट्रायल देखील दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे कस्टमर्सना हॅलोट्यून सबस्क्रिप्शन देखील मोफत देण्यात येणार आहे.


हेही वाचा – Motorola ने लाँच केला जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन; पाण्याने धुता येणार!

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -