घरटेक-वेकAirtel ग्राहकांसाठी खुशखबर! ३ महिन्यांसाठी YouTube प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळणार फुकट

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! ३ महिन्यांसाठी YouTube प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळणार फुकट

Subscribe

सध्या प्रत्येक दूरसंचार कंपनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध ऑफर्स देत आहे. त्याचप्रमाणे एअरटेल (Airtel) देखील आपल्या ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स देत आहे. तसेच विविध प्लॅन्सची मोठ्या प्रमाणात जाहिरात करताना दिसत आहे. आता एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एअरटेलच्या ग्राहकांना ३ महिन्यांसाठी युट्यूब (YouTube) प्रिमियम सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स Appद्वारे हे सब्सक्रिप्शन क्लेम करावे लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे युट्यूब प्रिमियम सब्सक्रिप्शन नाही आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर्स खूप फायदेशीर आहे.

दरम्यान युट्यूबच्या प्रिमियम सब्सक्रिप्शनच्या एका महिन्यांच्या सर्व्हिससाठी १२९ रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. हे सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर ग्राहक Add फ्री व्हिडिओ पाहू शकतात तसेच बँकग्राऊंडला युट्यूब म्युझिक ऐकू शकतात.

- Advertisement -

पण २२ एप्रिल २०२१ पर्यंत एअरटेलची ही नवीन ऑफर असणार आहे. पण एअरटेलची ही ऑफर युट्यूब रेड आणि गुगल प्ले म्युझिक सब्सक्रायबर्ससाठी नाही आहे. तसेच यापूर्वीच युट्यूब म्युझिक प्रिमियम आणि गुगल प्ले म्युझिकचा ग्राहकांनी वापर केला असेल तर अशा ग्राहकांना ही ३ महिन्यांची ऑफर मिळणार नाही आहे. पण या ग्राहकांनी युट्यूब प्रमियमचे नॉन म्युझिक फिचर जरुर मिळले.

एअरटेलच्या काही ग्राहकांच ही ऑफर मिळणार आहे. एअरटेल ग्राहकांना युट्यूब प्रिमियम फ्रीमध्ये वापर करायचा असेल तर त्यांना हा फॉर्म भरणे गरजेचे आहे. त्यानंतर या फॉर्मच्या माध्यमातून विनंती केल्यानंतर ग्राहकांना सहा महिन्यांची वाट पाहावी लागू शकते. मग तुम्हाला कंपनीकडून नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एक कोड मिळेल. ज्याच्या माध्यमातून तुम्ही युट्यूब प्रिमियम सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळू शकते.

- Advertisement -

तसेच महत्त्वाचे म्हणजे ऑफर क्लेम करण्यासाठी ग्राहकांना Airtel Thanks App असणे गरजेच आहे. या Appमध्ये गेल्यानंतर More ऑप्शनवर क्लिक केल्यावर तिथे Airtel Rewards ऑप्शन येईल. मग त्यावर ग्राहकाला क्लिक केल्यानंतर इंट्रेस्ट Add करावा लागेल. त्यानंतर YouTube Premium बॅनरवर क्लिक करावे लागले. ज्यानंतर ही ऑफर क्लेम करता येईल.


हेही वाचा – मोबाईलमधील WhatsApp खूप स्टोरेज खातोय? मग हे नवीन फिचर तुमच्या कामाचं आहे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -