घरटेक-वेक'Alcatel 1' अॅन्ड्रॉईड गो स्मार्टफोन लाँच

‘Alcatel 1’ अॅन्ड्रॉईड गो स्मार्टफोन लाँच

Subscribe

अल्काटेल १ चा बजेट स्मार्टफोन फोन लाँच. जाणून घेऊया काय आहेत याचे स्पेसिफिकेशन. कमी किमतीत मिळणारा हा फोन २००० एमएएच इतक्या बॅटरीचा आहे.

अल्काटेल १ चा बजेट स्मार्टफोन फोन लाँच झाला आहे. हा फोन अल्काटेल १ बजेट सिरीजचा एक भाग असून टीसीएलने वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला होता. यामधील पहिला हँडसेट अल्काटेल १ एक्स होता. हा अॅन्ड्रॉईड ८.१ ओरियो (गो एडिशन) शिवाय काही गुगल अॅप्ससह येतो ज्याला बजेट हार्डवेअरसाठी ऑप्टिमाईज करण्यात आले आहे. अल्काटेल १ चं स्पेसिफिकेशन आणि फीचर यासारखेच असले तरीही याची किंमत मात्र कमी आहे. या नव्या फोनमध्ये फुल व्ह्यू डिस्प्ले, १८:९ आस्पेक्ट रेशो, मीडियाटेक एमटी ६७३९ प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि २००० एमएच बॅटरी असे फिचर्स आहेत.

काय आहे किंमत?

अल्काटेल १ या फोनची किंमत साधारण ६,२०० रुपये आहे. काही ठराविक बाजारांमध्ये जुलै २०१८ पासून हा फोन उपलब्ध होईल. हा फोन भारतामध्ये लाँच करण्यात येणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही. फोनमध्ये मेटालिक ब्लॅक, मेटालिक ब्ल्यू आणि मेटालिक गोल्ड हे तीन रंग असतील.

- Advertisement -

काय आहेत स्पेसिफिकेशन?

या फोनमध्ये एकच सिम असून अॅन्ड्रॉईड ८.१ ओरिया (गो एडिशन) वर चालतो. याची स्क्रिन ५ इंचाची असून क्यूएचडी + (४८० x ९६० पिक्सल) फुल व्ह्यू १८:९ डिस्प्ले आहे. याचा क्लॉक स्पीड १.२८ गीगाहर्ट्ज आहे. तर १ जीबी रॅम असणार आहे.
यामध्ये ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमरा असून ८ मेगापिक्सलपर्यंत झूम होऊ शकतो. शिवाय एलईडी फ्लॅश आहे. अन्य फीचरमध्ये सोशल स्क्वेअर, इन्स्टंट कोलाज, वन-हँडेड मोड आणि फोटो बूथदेखील आहे. फ्रंट पॅनलचा कॅमेरा २ मेगापिक्सल इतका असेल.
याचा इनबिल्ट स्टोरेज ८ जीबी असून ३२ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डाचा वापर करता येऊ शकतो. कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ४ जी एलटीई, वाय-फाय, ८०२.११ बी/जी/एन, वाय-फाय डायरेक्ट, ब्ल्यूटूथ ४.२, मायक्रो – यूएसबी पोर्ट आणि जीपीएस/ए-जीपीएसचा समावेश आहे. एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्झिमिटी सेन्सरसुद्धा या फोनमध्ये आहेत.
या फोनची बॅटरी २००० एमएएच इतकी असून ४ जी नेटवर्क आहे. तर बॅटरी लाईफ ८ तासाचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण ३ तास २४ मिनिटं लागतात, तर याचं वजन १३४ ग्रॅम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -