घरटेक-वेकभारतात Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर लाँच

भारतात Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर लाँच

Subscribe

स्मार्ट स्पीकर निर्माता आणि ई- कॉमर्स Amazon कंपनीने Echo सिरीजमधील अजून एक पोर्टेबल स्मार्ट स्पीकर भारतात लाँच करण्यात आला आहे. सर्वात पहिले भारतात लाँच करण्यात आलेल्या स्पीकरची किंमत ४ हजार ९९९ रूपये इतकी आहे. ग्राहक ४ डिसेंबर म्हणजे आजपासूनच या प्रोडक्टची प्री-ऑर्डर करू शकतात. तसेच १८ डिसेंबर पासून सर्वत्र Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर खरेदी करता उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात २०१८ साली ७.५३ लाख Amazon Echo स्मार्ट स्पीकर्सची विक्री झाली होती.

Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकरची डिझाईन चांगल्याप्रकारे करण्यात आल्याने या स्पीकरला कोठेही नेणे सोयिस्कर ठरते. तसेच या स्पीकरला वायरलेस फीचर देखील देण्यात आले आहे. या स्पीकरची साईज लहान असल्याने त्याला सांभाळणे सोपे जाते. भारतीय युजर्सचा विचार करून  Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर तयार करण्यात आले आहे. हा स्पीकर मूव्हेबल असल्याने त्याला एका ठिकाणांहून दूसरीकडे सहज हलवता येते.

असे आहेत स्पीकरचे फीचर्स

  • Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकरचे टेक्निलकल स्पेसिफिकेशन्स उत्तम असल्याने युजर्समध्ये या प्रोडक्टला पसंती मिळत आहे.
  • पोर्टेबल स्मार्ट स्पीकरला ४ हजार ८०० एमएचच्या बॅटरी देण्यात आली आहे.
  • ४ हजार ८०० एमएचच्या बॅटरी देण्यात आल्याने युजर्सना १० तास बॅटरी बॅकअपची सुविधा मिळते
  • चांगले बॅटरी बॅकअप असल्याने युजर्स सलग दहा तास Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर वापरू शकतात.
  • Amazon Echo इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे स्प्लॅश रेसिस्टेंस आहे.
  • या पोर्टेबल स्मार्ट स्पीकरला वरच्या बाजूस चार मायक्रोफोन्स देण्यात आले आहे. यामुळे हे प्रोडक्ट यूजर्सच्या व्हॉईस कमांडला सहजतेने ऐकू शकतात.
  • यामध्ये १.३ व्हॅट पावर असणारे स्पीकर देण्यात आले आहे. ऑडिओ ऑऊटपुटसाठी ३६० डिग्री सिलिंड्रिकलचे फीचर्स देण्यात आले आहे.
  • याचे वजन साधारण ५१८ ग्रॅम असून युजर्सना सहजतेने हाताळता येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -