घरटेक-वेकAmazon Great Freedom Festival: ५ ऑगस्टपासून सुरू होणार सेल; 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर...

Amazon Great Freedom Festival: ५ ऑगस्टपासून सुरू होणार सेल; ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनवर ४० टक्क्यांची सूट

Subscribe

आज, सोमवारी Amazon Great Freedom Festival सेलची घोषणा केली आहे. याची सुरुवात ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा ५ दिवसांचा सेल ९ ऑगस्टच्या रात्री ११.५९ पर्यंत सुरू असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, स्मार्टटिव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर दमदार डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. ग्राहक SBI क्रेडिट आणि क्रेडिट EMIवर १० टक्के डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात. Amazon प्राईम मेंबर असलेल्या ग्राहकाला स्मार्टफोन खरेदीवर ३ महिने नो कॉस्ट EMI आणि ६ महिने फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधेची ऑफर केली जात आहे. तसेच Oppo, Vivo आणि Samsung फीचर फोन खरेदीवर ६५० रुपयांचे एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. शिवाय जुन्या स्मार्टफोन एक्सचेंज करण्यावर ३,५०० रुपयांची डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे.

कोणत्या स्मार्टफोनवर मिळणार सूट

Amazonमध्ये Tecno Pova 2 स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हा फोन 7000mAh बॅटरी आणि ६.९५ इंच FHD+ डिस्प्ले सपोर्टसोबत येईल. याशिवाय OnePlus Nord 2 5G, OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10T 5G, Redmi Note 10s, Mi 11x, Samsung M21 2021, Samsung M32, Samsung M42 5G, iQOO Z3 5G, iQOO 7, Tecno Camon 17 Series, Tecno Spark Go सारखे स्मार्टफोन सेलमध्ये विक्री करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ४० टक्के सूट दिली जाणार आहे. शिवाय मोबाईल एसेसरीज ६९ रुपयांपासून खरेदी करण्याचा पर्याय दिला गेला आहे.

- Advertisement -

कशावर किती मिळणार सूट?

कॅमेरा – ६० टक्के
ट्रायपॉड्स, रिंग लाईट – ६० टक्के
सिक्युरिटी कॅमेरा – ६० टक्के
इंस्टेंट पोलराइड कॅमेरा- सुरुवातीची किंमत २ हजार ९९९ रुपये
हेडफोन – ६० टक्के
म्युझिकल इंस्ट्रूमेंट – ६० टक्के
स्पीकर – ६० टक्के
लॅपटॉप – ३०,०००ची सूट
प्रिंटर – ३० टक्के सूट
४० पासून ४३ इंच स्मार्टटीव्ही – ५० टक्के सूट
४के टीव्ही – ६० टक्के सूट
३२ इंच स्मार्टटिव्ही – १२,९९९ रुपयांपासून सुरुवाती किंमत

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -