घरटेक-वेकAmazon Great Indian Festival: दर २ तासांमध्ये विशेष ऑफर

Amazon Great Indian Festival: दर २ तासांमध्ये विशेष ऑफर

Subscribe

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्समध्ये स्मार्टफोन कमी किमतीत मिळेल.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल १० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या रेड मी 6A स्मार्टफोनवर विशेष ऑफर्स आहे. यापूर्वी आलेल्या ऑफर्समध्ये मिळणाऱ्या फोन्सवर घसघशीत सूट असल्याने काही सेकंदात हे फोन्स आउट ऑफ स्टॉक होतात. अशा ऑफर आठवड्यातून एकदाच येतात. त्यामुळे अनेकदा या ऑफर्सचा फायदा मिळवण्यासाठी युजर्सला उशीर होतो. मात्र या फेस्टिव्हलमध्ये ही ऑफर एका दिवसात ८ वेळा दाखवली जाणार आहे. यात रेड मी 6A स्मार्टफोनवर विशेष सुट लोकांना मिळणार तर आहेच याच बरोबर त्यांच्या पैशाचीही बचत होणार आहे. ही ऑफर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरु केली जाईल तर रात्री १० वाजता शेवटची ऑफर दाखवली जाईल.

किती आहे फोन्सची किंमत?

भारतात रेड मी 6A हा मागील महिन्यातच लॉन्च झाला होता. बाजारात आल्यावर या स्मार्टफोनला चांगाल प्रतिसाद मिळाला. यानंतर अॅमेझॉन आणि Mi.com या साईट्सवर विक्रीसाठी हा फोन उपलब्ध होता. हा फोन विकत घेऊ इच्छिनाऱ्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. कारण अॅमेझॉन फेस्टिव्हलमध्ये आठ वेळा त्यांना हा फोन कमी किमतीत विकत घेण्याची संधी मिळणार आहे. १६GB इंटरनल स्टोरेज मेमरीच्या फोन्सची किंमत ५,९९९ रुपये तर ३२GB इंटरनल स्टोरेज मेमरीच्या फोन्सची किंमत ६,९९९ रुपये आहे.

- Advertisement -

काय आहे विशेष ऑफर

जियोच्या ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर २ हजार २०० रुपयांचा कॅशबॅक आणि १००GB फ्री इंटरनेट डेटा मिळणार आहे. याचबरोबर अॅमेझॉन २ हजार रुपयांपर्यंत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफरसुद्धा देणार आहे. या ऑफरमध्ये मिळणारा रेड मी 6A काळा, सोनेरी आणि निळ्या रंगात मिळणार आहे.

रेड मी 6A ची विशेषतः

या फोनची स्क्रीन ५.४५ इंच एचडी(७२०x१४४० पिक्सल) आहे. या फोनमध्ये २GB रॅम आहे. १३ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा या फोनमध्ये आहे. ३ हजार एमएएच पर्यंत बँटरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -