घरटेक-वेकAmazonने 'स्कूल फ्रॉम होम' स्टोअर भारतात केलं सुरू

Amazonने ‘स्कूल फ्रॉम होम’ स्टोअर भारतात केलं सुरू

Subscribe

अॅमेझॉनच्या स्कूल फ्रॉम होम या स्टोअरबद्दल जाणून घ्या.

कोरोना व्हायरसमुळे एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग असावी यामुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहे. शिवाय मुलांना देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिकवलं जात आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल सारख्या दूरसंचार कंपन्यांनी कमी किंमती जास्त डेटा मिळाणारे प्लॅन लाँच केले आहे. तसेच आता मुलांच्या चांगल्या सोयीसाठी ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने एक विशेष सेवा आणली आहे. अॅमेझॉनने ‘School from Home’ (स्कूल फ्रॉम होम)  स्टोअर लाँच केलं आहे. येथे मुलांच्या शैक्षणिक संबंधित सर्व आवश्यक गोष्टी एकाच वेळी उपलब्ध असतील.

कंपनी म्हणते की, स्कूल फ्रॉम होम स्टोअर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घरात चांगलं लर्निंग झोन तयार करण्यास मदत करते. या स्टोअरवर स्टेशनरी, लॅपटॉप, टॅब्लेट, पीसी, हेडसेट्स आणि स्पीकर्स, प्रिंटर्स आणि होम फर्निशिंग यासारख्या वस्तू अभ्यासाठी असतील.

- Advertisement -

अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉनवरील अलीकडील सर्च ट्रेंडवरून असे दिसून आले की, घरगुती उत्पादन आणि शाळेच्या वस्तू अधिक सर्च होत आहेत. हेडफोन आणि इअरफोनसाठीच्या सर्चमध्ये १.७ पटीने वाढला आहे. तसेच लॅपटॉप आणि टॅब्लेटचा सर्च २ पटीने वाढला आहे. स्टेशनरीसाठी जवळपास सर्च १.२ पटीने वाढत आहे. तर स्टडी टेबलसाठीचा सर्च २.५ पटीने वाढला आहे.

पालकांना शैक्षणिक गोष्टी खरेदी करणे सोयीस्कर जाण्यासाठी स्कूल फ्रॉम होम स्टोअर अॅमेझॉनने लाँच केलं आहे. या स्टोअर शैक्षणिक वस्तू संबंधित सर्व काही मिळले. तसेच आकर्षक ऑफर आणि डिल्स देखील मिळतील. स्टेशनरी व्यतिरिक्त बुकशेल्फ, स्टडी प्लॅम्प अशा देखील वस्तू उपलब्ध आहेत. तसेच खेळण्यासाठीच्या देखील वस्तू तुम्ही या स्टोअरवरून खरेदी करू शकता.

- Advertisement -

अॅमेझॉनने स्कूल फ्रॉम होम स्टोअरसारखी सुविधा फ्लिपकार्ट आणि इतर कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नाही आहे. परंतु टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे ई-कॉमर्स क्षेत्रात देखील एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. फ्लिपकार्टने नुकतेच फ्लाइट तिकीट पोर्टल लाईव्ह केलं असून आता युजर्स या संकेतस्थळावर शॉपिंगबरोबरच फ्लाइटची तिकीटही बुक करू शकतात.


हेही वाचा – Zoom ला टक्कर देण्यासाठी आला देशी ‘Say Namste’ App


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -