घरटेक-वेकAmazon Primeच्या ग्राहकांना मिळणार अर्ध्या किंमतीत सबस्क्रिप्शन

Amazon Primeच्या ग्राहकांना मिळणार अर्ध्या किंमतीत सबस्क्रिप्शन

Subscribe

काही दिवसांपूर्वीच Amazonने Primeवरील एक महिन्याची मेंबरशिप बंद केली

Amazon India ने Prime मेंबरशिपसाठी एक खास ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर Amazon India च्या यूथसाठी असणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी त्या युझर्सचे वय १८ ते २४ वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे. त्यांनी जर Amazon Primeची मेंबरशिप घेतली तर त्यांना ५०० रुपयांपर्यतचा कॅशबॅक मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच Amazonने Primeवरील एक महिन्याची मेंबरशिप बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता थेट तीन किंवा एक वर्षाची मेंबरशिप घ्यावी लागते. तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी युझर्सना ३२९ रुपये द्यावे लागतात आणि एका वर्षांसाठी ९९९ रुपये. नवीन ऑफरमुळे हे सबस्क्रिप्शन युझर्सना अर्ध्या किंमतीत मिळणार आहे. (Amazon Prime customers will get a half price subscription)

Amazonची ही नवीन ऑफर केवळ Android युझर्सासाठी आहे. डेस्कटॉप किंवा ISO डिवाइस असलेले युझर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकत नाहीत. ही ऑफर घेतल्यावर युझर्सना ३ महिन्याचे Amazon Prime सबस्क्रिप्शन १६४ रुपयांना मिळणार आहे. तर एक वर्षांचे सबस्क्रिप्शन ४९९ रुपयांना मिळणार आहे. Amazon Primeचे सबस्क्रिप्शन असलेल्या युझर्सना फ्री डिलीव्हरी,Amazon Prime Voido आणि Amazon Musicचा एक्सेसही फ्री देण्यात येतो त्याचप्रमाणे अनेकदा त्यावरही बेनिफिट्स मिळवता येतात.

- Advertisement -

Amazon Primeची नवीन ऑफर मिळवण्यासाठी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अपलोड करावे लागले. त्यानंतर युझर्सला पॅन कॉर्ड,आधार कार्ड, वोटर आयडी किंवा ड्रायविंग लायसन्स तिथे अपलोड करावे लागले. त्याचबरोबर तिथे युझर्स आपला सेल्फीही अपलोड करु शकतात. एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक वर्षांच्या सबस्क्रिप्शनवर ५०० रुपयांपर्यंत कॅश बॅक आणि तीन महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर १६५ रुपयापर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.


हेही वाचा – भारतातीयांनो ३ लाखातल्या Best Budget Cars, टचस्क्रिन इन्फोटेनमेंट अन् जबरदस्त मायलेज

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -