घरटेक-वेकआयफोन ११ सिरिजचे ३ फोन लाँच; 'हे' आहेत फिचर्स

आयफोन ११ सिरिजचे ३ फोन लाँच; ‘हे’ आहेत फिचर्स

Subscribe

भारतामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवा आयफोन विक्री करिता उपलब्ध

खूप प्रतिक्षेत असणाऱ्या आयफोन ११ सिरिजचे तीन फोन लाँच करण्यात आले आहे. अॅपलने आपल्या कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये असलेल्या सोहळ्यात हे फोन लाँच करण्यात आले आहे. अॅपलने आपल्या आयफोन सिरिजमधील आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे फोन लाँच केले आहे. या सोहळ्या दरम्यान, आयफोनच्या तीन सिरिजसह आयपॅड आणि अॅपल वॉचची देखील घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

आयफोन ११ च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ६९९ डॉलर्स, आयफोन ११ प्रोच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ९९९ डॉलर्स, तर आयफोन ११ प्रो मॅक्सच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत १,०९९ डॉलर्स ठेवण्यात आली आहे. ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB व्हेरिअंटमध्ये तिन्ही आयफोन उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

भारतामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवा आयफोन विक्री करिता उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात विक्री होणाऱ्या आयफोन ११च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ६४ हजार ९०० रूपये,आयफोन ११ प्रो च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ९९ हजार ९०० रूपये आणि आयफोन ११ प्रो मॅक्सच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत १ लाख, ९ हजार ९०० रूपये असेल.

आयफोन ११ चे फिचर्स

  • ६.१ इंचाचा LCD रेटिना डिस्प्ले
  • पर्पल, व्हाईट, ग्रीन, रेड, ब्लॅक आणि येल्लो कलर्स उपलब्ध
  • २ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे (मेन कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स)
  • नाईट मोड फिचर
  • ६४ fps ने याद्वारे ४K व्हिडीओ रेकॉर्डिंग
  • आयफोन ११ मध्येही नवी A१३ Bionic चीप

आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्सचे फिचर्स

  • आयफोन ११ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप
  • आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स या दोन्ही मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • नवी Apple A१३ Bionic ही चीप लॉन्च
  • आयफोन ११ प्रो मध्ये ५.८ इंचाचा OLED डिस्प्ले
  • आयफोन ११ प्रो मॅक्स मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले
  • सर्व फोनमध्ये A१३ Bionic प्रोसेसर

अशी आहे किंमत

  • आयफोन ११ – ६९९ डॉलर
  • आयफोन ११ प्रो – ९९९ डॉलर
  • आयफोन ११ प्रो मॅक्स – १०९९ डॉलर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -