घरटेक-वेकअॅपलचा वाकणारा फोन....ठरतोय वादग्रस्त

अॅपलचा वाकणारा फोन….ठरतोय वादग्रस्त

Subscribe

अॅपलने लाँच केलेला आय फोन ६ आणि आयफोन ६ प्लस सद्ध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. आयफोनच्या वाकण्याच्या डिझाईनमुळे हा वाद सुरु आहे.अॅपलचा आयफोन ६ प्लस वाकत असतांना, त्याच्या डिस्प्लेमध्ये बऱ्याच तांत्रीक अडचणी दिसून आल्यात. त्याविरोधात अनेकांनी तक्रारी केल्यात परंतू अॅपलने त्या तक्रारीकडे दुरलक्ष केले.२०१४ मध्ये आय फोनच्या लॉंचिंगनंतर काही महिन्यांतच एक रिपोर्ट आला होता. त्यात हे लक्षात आले होते की, फोनच्या वाकण्याच्या डिझाईनमुळे त्याच्या टच स्र्किनवर विपरीत प्रभाव पडतो.तर बऱ्याच जणांनी या फोनच्या वाकण्याच्या डिझाईनमुळे त्याच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थीत केला होता. इतर फोनच्या तुलनेने ह्या फोनचा कणखरपणा कमी असल्याचेही अनेकांनी म्हटले.

अॅपल ने आरोप झुडकावले
मात्र अॅपल ने सर्व आरोप झुडकावून लावले. त्यांनी हे मान्यच केले नाही की, फोनच्या डिझाईनमुळे त्याच्या टच स्क्रिनमध्ये बिघाड होतोय.
उलट त्यांनी असे वक्तव्य केले की, फोनच्या डिझाईनमुळे हा बिघाड नसून, फोनच्या टच स्र्किनचा हा पुर्णत: वेगळा प्रॉबलेम आहे. अगदी ठरावीकच फोनमध्ये हा बिघाड दिसून आला असून त्यांना आम्ही कमी दरात त्यांचा फोन दुरुस्त करुन देऊ.

- Advertisement -

न्यायालयाने उघड केली सत्यता
मदरबोर्डने न्यायालयाच्या हे लक्षात आणून दिले आणि त्याच्याशी संबंधीत कागदपत्रेही सादर केलीत. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती लुसी कोह यांनी त्यातील काही गोष्टी सार्वजनिकरीत्या उघड केल्या, आयफोन लाँच करण्याआधीच अॅपलला त्याच्या चाचणीमध्ये हे लक्षात आले होते कि, पुर्विच्या फोनच्या तुलनेत नवीन फोन अधिक सहज वाकतो. तसेच त्याच्या वाकण्यामुळे त्याच्या स्क्रिनमध्ये  तांत्रीक बिघाड होतो. तरीही अॅपलने त्या फोनमधील दोष दुर न करता, त्याची बाजारात विक्री केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -