Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक चीनमधून ॲपलचा काढता पाय; भारतात करणार एन्ट्री

चीनमधून ॲपलचा काढता पाय; भारतात करणार एन्ट्री

स्मार्टवॉच उत्पादन घेण्यासाठी भारत सरकारच्या पीएलआय योजनेमध्ये प्रोत्साहन

Related Story

- Advertisement -

ॲपल कंपनी आपला प्रकल्प चीनमधून हलवून भारतात आणणार असल्याच्या तयारीत आहे. भारतात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेंतर्गत ॲपल आपले बस्तान भारतात हलवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या घडीची ॲपल ही आघाडीची कंपनी आहे. चीनमधल्या प्रकल्पात ॲपल आयपॅडचे उत्पादन केले जाते. परंतु आता आयपॅडचे उत्पादन आता भारतात होणार असल्याचे ॲपलकडून कळत आहे. ॲपलच्या स्मार्टफोनलास निर्यातीमध्ये अधिक चालना मिळण्यासाठी भारत सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. भारत सरकारद्वारे या अधिक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी योजनेमध्ये सुमारे ५० हजार कोटींचा निधीही देण्यात येत आहे.

चीनच्या दुटप्पी वागणूकीमुळे आणि कोरोना काळानंतर सर्वच देशांशी वैर निर्माण झाले आहे. तसेच चीनवर असलेले अवलंबित्व करमी करुन फॉक्सकॉनच्या माध्यमातून आयपॅडचे उत्पादन भारतात करणार असल्याची तयारी सुरु केली असल्याचीही माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धामुळे तसेच संघर्षामुळे ॲपल कंपनीने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे अॅपल कंपनी आता चीनमधून आपला गाशा गुंडाळायाच्या तयारीत आहे. ॲपल अधिकाधिक आयपॅडचे चीनमध्ये उत्पादन घेते तसेच लॅपटॉपचे व्हिएतनाममध्ये तयार केले जातात. आता ॲपल आयपॅडचे उत्पादन भारतात करण्यासाठी ॲपल २० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे बोलले जात आहे.

भारतात अॅपल स्मार्टवॉच उत्पादन करण्यासाठीही भारत सरकारच्या पीएलआय योजनेमध्ये प्रोत्साहन दिला आहे. स्मार्टवॉच उत्पादनासाठी भारत सरकारद्वारे ५ हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला जाऊ शकतो.

- Advertisement -