घरटेक-वेकआसूसने आणले जगातील सर्वात लहान आकाराचे लॅपटॉप

आसूसने आणले जगातील सर्वात लहान आकाराचे लॅपटॉप

Subscribe

आसूसने सर्वात लहान आकाराच्या झेनबुक शृंखलेचे लॅपटॉप भारतीय बाजारात सादर केले. यात झेनबुक १५ (युएक्स ५३३), १४ (युएक्स ४३३), १३ (युएक्स ३३३) या लॅपटॉपचा समावेश आहे.

आसूसचे पीसी आणि गेमिंग प्रमुख, अर्नोल्ड सू म्हणाले, जगातील सर्वात छोटा लॅपटॉप सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. त्याच्यात परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणतीच तडजोड केलेली नाही आणि निव्वळ पोर्टेबिलिटीवर लक्ष दिलेले आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या उपभोक्त्यांना आमची नवीन झेनबुक श्रेणी आवडेल.”

- Advertisement -

झेनबुक श्रेणीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये खास नवीन नंबरपॅड ड्युअल फंक्शन टचपॅड आहे जे उत्पादकता वाढवते आणि थ्रीडी आयआर कॅमेरा, जो कमी उजेडात देखील जलद फेस-लॉगिन करतो. यातील एर्गोलिफ्ट हिंज कीबोर्डला मागील बाजूस वर करतो त्यामुळे टायपिंग करणे सुलभ होते. तसेच त्याचे कूलिंग आणि ऑडिओ परफॉर्मन्स देखील सुधारते.

झेनबुक १५ (युएक्स ५३३)
या १५.६ इंची लॅपटॉपमध्ये आहे ४-के डिस्प्ले
झेनबुक १५ मध्ये आहे एक फिजिकल न्युमरिक पॅड
हा लॅपटॉप एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर १६ तास चालतो

- Advertisement -

झेनबुक १४ (युएक्स ४३३)
पूर्ण एचडी डिस्प्ले असलेला १४इंची लॅपटॉप
ए४ आकाराच्या कागदाची मापे यात चपखल बसतात
एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर १४ तास चालतो
यात एक नंबरपॅड आयकॉन आहे जो दाबल्यास पूर्ण आकाराचे एलईडी प्रकाशित न्यूमरिक कीपॅड प्रकट होते, ज्यामुळे डेटा एंट्री आणि आकडेमोड जलद शक्य होते.

झेनबुक १३ (युएक्स ३३३)
संपूर्ण एचडी डिस्प्ले असलेला जगातील सर्वात कॉम्पॅक्ट १३ इंची लॅपटॉप.
झेनबुक १३ हा ए-४ पेपरपेक्षाही लहान आहे.
नंबरपॅडमुळे आकडेमोड करणे सोपे होते.
पूर्ण-आकाराच्या एलईडीनी प्रकाशित न्यूमरिक कीपॅड यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -