घरटेक-वेकभारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

Subscribe

इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शुद्ध उर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. इंधानाचे साठे मर्यादित असून याचा वापर कमी व्हावा यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या स्कूटर्स वापरावर भर दिला जात आहे. याच अनुशंघाने बंगळुरू येथील अथर एनर्जीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये एखाद्या स्मार्टफोन सारखे फीचर्स आहेत. ही स्कूटर चार्जिंगवर चालणार असून यासाठी बंगळुरूत ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट बसवण्यात येणार आहेत. अथर S३४० आणि अथर ४५० हे दोन मॉडेल कंपनीने लाँच केले आहेत.

स्कूटरची खासियत

या दोन्ही स्कूटर्स चार्जींगवर चालणार असून यामध्ये इंधनाचा वापर होत नाही. अथर S ३४० ची किंमत १ लाख ९ हजार ७५० तर अथर ४५० ची किंमत १ लाख २४ हजार ७५० रुपये आहेत. या व्यतिरीक्त चार्जिंग स्टेशनवर चार्जिंगची सुविधा, नियमीत मेंटेनन्स, पार्ट रिप्लेसमेंट आणि अनलिमीटेड इंटरनेट सुवाधाही ग्राहकांना मिळणार आहे. या सुविधांसाठी त्यांना महिन्याला ७०० रुपये अधिक भरावे लागणार आहे. या स्कूटरचा लुक आधुनिक पद्धतीचा असून यात स्पीडोमिटरच्या जागी टच स्क्रीन बसवण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर ६० किमीपर्यंत अंतर कापू शकते. स्कूटरचा सर्वाधिक वेग ७२ किमी प्रति तास आहे.

- Advertisement -

मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांची कल्पना

तरुण मेहता आणि स्वप्नील जैन या दोघांनी मागील चार वर्षांपासून ही बाईक बनवायला सुरुवात केली होती. हे दोघे आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी आहेत. सर्व प्रथम बंगळुरू शहरात या स्कूटरचे लाँच करण्यात आले आहे. बंगळुरु नंतर संपूर्ण देशातील मुख्य शहरांमध्ये ही स्कूटर लाँच करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -