घरटेक-वेकBajaj Auto:ग्राहकांसाठी खुशखबर! आता ३१ जुलै पर्यंत घेऊ शकता फ्री सर्व्हिसचा आनंद

Bajaj Auto:ग्राहकांसाठी खुशखबर! आता ३१ जुलै पर्यंत घेऊ शकता फ्री सर्व्हिसचा आनंद

Subscribe

सर्व टू व्हिलर्स आणि कमर्शिअल वाहनांसाठी बजाज ऑटोची फ्री सर्व्हिस

कोरोना काळात सर्वांना मोठा फटका बसला आहे. त्यात बजाज त्यांच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. टु व्हिलर तयार करणाऱ्या बजाज अँटोने आपल्या सर्व मॉडेल्ससाठी फ्री सव्हिसचा कालवधी वाढवला आहे. त्यामुळे आता बजाजच्या ग्राहकांना ३१ जुलै पर्यंत फ्री सर्व्हिस मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे बजाजने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ज्या वाहनांची सर्व्हिस १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान संपणार होती त्यांचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांना होणारा त्रास आम्हाला समजतो आहे, त्यामुळे ३१ जुलैपर्यंत ग्राहकांना फ्री सर्व्हिस मिळणार आहे, असे बजाज ऑटोचे संचालक राकेश शर्मा यांनी म्हटले आहे. (Bajaj Auto  free service till 31st July)

बजाज ऑटोची फ्री सर्व्हिस सर्व टू व्हिलर्स आणि कमर्शिअल वाहनांसाठी असणार आहे. गेल्या वर्षीही बजाजने दोन महिन्यांसाठी कालावधी वाढवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनांची योग्य काळजी घेतली जाईल अशी खात्री बजाजकडून ग्राहकांना देण्यात आली आहे. कंपनी देशभरात त्यांच्या डिलरशिपद्वारे सर्व ग्राहकांना फ्री सर्व्हिस कालावधमध्ये झालेल्या वाढीचा फायदा देणार आहे.

- Advertisement -

बजाजप्रमाणेच याआधी होंडानेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डिलरशिप ३१ जुलैपर्यंत वॉरंटी आणि फ्री सर्व्हिसच्या कालावधीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्या ग्राहकांची फ्री सर्व्हिस बाकी आहे त्यांना ३१ जुलै पर्यंत त्याचा फायदा घेत येणार आहे.


हेही वाचा – स्वस्त झाला Samsung चा 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन; जाणून घ्या ट्रिपल कॅमेऱ्यासह इतर फीचर्स

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -