घरटेक-वेकOTP शिवाय Battlegrounds Mobile India होणार नाही लॉगिंन; एका दिवसात किती वेळा...

OTP शिवाय Battlegrounds Mobile India होणार नाही लॉगिंन; एका दिवसात किती वेळा खेळू शकाल? वाचा

Subscribe

देशातील सर्व PUBG प्रेमी Battlegrounds Mobile India गेमची वाटत पाहत आहेत. या गेमची तुलना PUBGसोबत केली जात आहे. या नव्या गेमच्या माध्यमातून PUBGसारखा अनुभव मिळवा, अशी युजर्सची अपेक्षा आहे. दरम्यान Krafton पण युजर्सची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज Battlegrounds Mobile India बाबत एक नवीन महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. जेव्हा एखादा युजर या गेमला लॉगिंन करेल तेव्हा त्याला एक OTP टाकावा लागेल. याबाबतची माहिती गेम सपोर्ट पेजवर दिली गेली आहे.

सपोर्ट पेजवर सांगितले गेले आहे की, ‘भारतात Battlegrounds Mobile India OTPच्या माध्यमातून लॉगिंन केला जाऊ शकतो. PUBGचे बोलायचे झाले तर, या गेमला युजर फेसबुक, गुगल प्ले किंवा गेस्ट अकाउंटद्वारे लॉगिंन करत होते. Kraftonच्या सपोर्ट पेजवर अनेक गोष्टींची माहिती दिली गेली आहे. खेळणाऱ्याला किती वेळा OTP दिला जाऊ शकतो हे देखील सांगण्यात आले आहे. एकदा OTP दिल्यानंतर वैधता काय असेल इत्यादी गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. जर युजरला हा गेम खेळायचा असेल तर त्याच्याकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे असेल आणि लॉगिंन करण्यासाठी OTP देखील महत्त्वाचा आहे. OTP शिवाय Battlegrounds Mobile India खेळणे शक्य नाही आहे.

- Advertisement -

Battlegrounds Mobile India वेबसाईटनुसार, फक्त तीन वेळा वेरिफाय कोड नोंद करू शकता. वेरिफाय कोड टाकण्याचा वेळ ५ मिनिटे असेल. दिवसातून युजर १० वेळा OTP रिक्वेस्ट करू शकतात. जर युजर यापेक्षा जास्त रिक्वेस्ट करत असतील तर त्यांच्यावर २४ तासांची बंदी घातली जाईल. एका मोबाईलनंबरवरून १० अकाउंट्स रजिस्टर केले जाऊ शकतात.

भारतात सप्टेंबर महिन्यात PUBG Mobileवर बंदी घालण्यात आली होती. ज्यानंतर PUBGसारखे अनेक गेम लाँच केले गेले. परंतु PUBG युजर्सना यापैकी कोणताही गेम आवडला नाही. अशातच आता Battlegrounds Mobile India भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. PUBG प्रेमी या गेमची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु हा कधी लाँच होईल याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केली नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bullet घेताय? तर जाणून घ्या Royal Enfiled Classic 350 ने आणलीय धमाकेदार ऑफर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -