Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक महागड्या पेट्रोल-डिझेल पासून व्हा कायमचे मुक्त, खरेदी करा या ५ इलेक्ट्रिक कार

महागड्या पेट्रोल-डिझेल पासून व्हा कायमचे मुक्त, खरेदी करा या ५ इलेक्ट्रिक कार

Related Story

- Advertisement -

देशात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. पण उपाय नाही. सरकारनेही हात वर केले आहेत. अशा परिस्थितीत, पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबन कमी करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारही या दिशेने वेगवान काम करीत आहे. दिल्ली सरकार अगदी इलेक्ट्रिक कार खरेदीवर अनुदान देत आहे.

जर आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून मुक्त करायचे असेल तर इलेक्ट्रिक कार खरेदी करणे हाच एकमेव उपाय सध्या तरी आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक कारच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारे सूट देण्यात येत आहे. तसे, भारतात बर्‍याच सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक कार आहेत.

TATA NEXON EV

- Advertisement -

टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारची भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. २०२० मध्ये, इलेक्ट्रिक वाहन विभागात नेक्सनचे वर्चस्व होते. गेल्या वर्षी टाटा नेक्सन ईव्हीने एकूण २,५२९ युनिटची विक्री केली. टाटा मोटर्सची सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सन ईव्ही एक्स-शोरूम किंमत १३.९९ लाख ते १६.२५ लाख रुपयांदरम्यान आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात सुरक्षित कार देखील आहे.

गाडी एकदा पूर्ण चार्ज केली की, ३१२ किमी पर्यंत चालवू शकता. त्याच वेळी, ८ वर्षांची स्टँटर्ड वॉरंटी आणि आयपी ६७ वॉटरप्रूफ बॅटरी पॅक देखील यात समाविष्ट केला आहे. चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर नेक्सनची बॅटरी अवघ्या ६० मिनिटांत ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

MG ZS EV

- Advertisement -

आपण एमजी मोटरची इलेक्ट्रिक कार एमजी झेडएस ईव्ही देखील खरेदी करू शकता. याचीही भारतात चांगली मागणी आहे. एमजी मोटरने जानेवारी २०२० मध्ये एमजी झेडएस ईव्ही लाँच केली. २०२० मध्ये एकूण १,१४२ कारची विक्री झाली. त्याची किंमत २०.८८ लाख ते २३.५८ लाख रुपयांदरम्यान आहे. हे Excite आणि Exclusive अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा असा दावा आहे की ही कार एकदा चार्ज केल्यावर ३४० किमी पर्यंत जाऊ शकते. त्याच वेळी, 7.4 Kw चार्जरच्या मदतीने ६-८ तासात ० ते १०० टक्के चार्ज होते.

Hyundai Kona

आपल्याला थोडी लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असल्यास आपल्यासाठी ह्युंदाई कोना हा एक चांगला पर्याय आहे. २०२० मध्ये ह्युंदाई कोना या इलेक्ट्रिक कारच्या एकूण २२३ युनिटची विक्री करण्यात कंपनीला यश आले. २०२० मध्ये या कारचा बाजारात वाटा ५.६ टक्के होता. दिल्लीतील ह्युंदाई कोनाची एक्स शोरूम किंमत २३.७५ लाख ते २३.९४ लाख रुपयांदरम्यान आहे.

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार २०१९ मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. ह्युंदाई कोनामध्ये ३९.३ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी १३६ एचपीची पॉवर जनरेट करते. पूर्ण चार्ज केल्यास ही कार ४५२ किमी पर्यंत धावू शकते.

Tata Tigor

याशिवाय टाटाची इलेक्ट्रिक कार टिगोरही खरेदी करता येईल. टाटा टिगोर ईव्हीची प्रारंभिक किंमत ९.५८ ते ९.९० लाख रुपये दरम्यान आहे. टाटा टिगोर पूर्ण चार्ज केल्यास २१३ किमी पर्यंत चालवू शकते. यात २१.५ किलोवॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे. सुमारे ११ तासांमध्ये त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज केली जाते.

Mahindra e-Verito

तुम्हाला महिंद्रा आणि महिंद्राची इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर महिंद्र ई-वेरिटो खरेदी करू शकता. भारतीय बाजारात त्याची किंमत ९.१३ लाख ते ११.६ लाख रुपयांदरम्यान आहे. त्याची बॅटरी पूर्ण चार्जवर १८१ किमी चालवू शकता. महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये २१.२ किलोवॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे.


हेही वाचा – भारतात यावर्षी लाँच होणार सर्वांत स्वस्त ‘या’ इलेक्ट्रीक कार


 

- Advertisement -