घरटेक-वेकगेम खेळणाऱ्यांसाठी जबरदस्त OnePlus 9R 5G स्मार्टफोन लाँच

गेम खेळणाऱ्यांसाठी जबरदस्त OnePlus 9R 5G स्मार्टफोन लाँच

Subscribe

वनप्लस (Oneplus) या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीने अलिकडेच वनप्लस ९आर ५जी (OnePlus 9R) हे खास गेमिंगमध्ये रस असलेल्यांच्या मागण्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेले नवे डिव्हाइस अलिकडेच सादर केले. वनप्लस९आर ५जीमुळे प्रीमिअम वनप्लस स्मार्टफोनचा अनुभव अधिकाधिक ग्राहकांना विविध दरांमध्ये उपलब्ध करून देण्याची ब्रँडची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.

“भारतात वनप्लस ९आर ५जी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. गेमिंगमध्ये रस असलेल्या अधिकाधिक मंडळींसाठी सर्वोच्च पातळीवरील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे विनासायास एकत्रीकरण यामुळे उपलब्ध होणार आहे,” असे वनप्लसचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट लाऊ यांनी सांगितले.

- Advertisement -

दमदार फिचर्स

वनप्लस ९आर ५जी हे डिव्हाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० मोबाइल प्लॅटफॉर्मने परिपूर्ण असल्यामुळे आधीच्या पिढीतील डिव्हाइसपेक्षा १२.६ टक्के वेगवान प्रोसेसिंग स्पीड मिळून तो गेमिंग पॉवरहाऊस बनला आहे. वेगवान ५ जी कनेक्शनमुळे वनप्लस ९आर ५जीवर ८७५ एमबी प्रति सेकंड इतका डाउनलीड स्पीड मिळतो, त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचे गेम्स आणि शोज क्षणार्धात डाऊनलोड करण्याचे अथवा स्ट्रीम करण्याचे सामर्थ्य मिळते. ड्युअलमोड एनएसए + एसए ५जी आणि वायफायमुळे हे सामर्थ्य अधिक वृद्धिंगत होऊन वेगवान डाटा स्पीड आणि अधिक लवचिकता प्राप्त होते. या व्यतिरिक्त वनप्लस ९आर ५जीचे यूएफएस ३.१ फ्लॅश स्टोअरेज हे यूएफएस ३.०च्या तुलनेत साधारणतः तिप्पट आणि सामान्य मायक्रोएसडी कार्डच्या तुलनेत १० पट अधिक वेगवान कामगिरी बजावते. ५४० एमबी प्रति सेकंड या वेगाने काम करणाऱ्या पीसी आधारित एसएटीए एसएसडीपेक्षाही ही कामगिरी वरचढ असून त्यामुळे वापरकर्त्यांना अगदी सहजरित्या एकाचवेळी अनेक कामे करता येतात.

अद्वितीय गेमिंग

कॅज्युअल तसेच हार्डकोअर गेमर्स अशा दोघांनाही नजरेसमोर ठेवून बनवण्यात आलेल्या वनप्लस ९आर ५जीच्या २४० हर्ट्झ टच सँपलिंग रेटमुळे वापरकर्त्यांना वेगवान गेमिंग आणि सुलभ कामगिरीसाठी एकाच वेळी पाचही बोटे वापरणे शक्य होते. याखेरीज यात एक्स-एक्सिस लिनीअर मोटर असून परिपूर्ण गेमिंग अनुभव मिळवून देण्यासाठी अत्युत्कृष्ट डायनॅमिक व्हायब्रेशन निर्माण करून विविध प्रकारच्या इन-गेम व्हायब्रेशन्ससाठी ती सहज सुरू करता येऊ शकते. अधिक क्षमतेचे ड्युअल स्टिरिओ स्पीकर्समुळे तीव्र, सजीव थ्रीडी आवाजानुभव मिळतो आणि डॉल्बी एटमॉसमुळे ऑडिओमुळे ऑगमेंटेड डिरेक्शनल ऑडिओ क्यूजसह सिच्युएशनल अवेअरनेस वाढतो. एकमेवाद्वितीय अशा मल्टीलेअर कूलिंग सिस्टिमच्या माध्यमातून वनप्लस ९आर ५जी अधिक वरच्या स्तरावरील मोबाइल गेमिंग अनुभव देतो. डिव्हाइसमध्ये ग्रॅफाइट व कॉपर लाइन्ड व्हेपर चेंबर वापरल्यामुळे डिव्हाइस थंड राहाते आणि गेमिंगच्या वेळी प्लग्ड इन अवस्थेत असेल अथवा रस्त्यावर, स्थिर आणि सातत्यपूर्ण अशी कामगिरी करत राहाते.

- Advertisement -

१२० हर्ट्झ फ्लुइड एमोलेड डिस्प्ले

वनप्लस ९आर ५जीच्या ६.५५ इंची फ्लुइड एमोलेड डिस्प्लेमुळे प्रत्येक फ्रेममध्ये अल्ट्रा-स्मूथ स्क्रोलिंग मिळते. क्रिस्प १२० हर्ट्झ पॅनेलमुळे सपाट डिस्प्ले अविस्मरणीय असा दृष्यानुभव देतो. वाढीव अचूक रंगसंगती आणि तपशील यामुळे वनप्लस ९आर ५जीच्या एफएचडी+ डिस्प्लेची प्रत्येक फ्रेम ११०० निट्स व ८१९२ पातळीच्या ऑटोमॅटिक ब्राइटनेसपर्यंत सजीव होते. डिस्प्लेमधून निळ्या रंगाचा प्रकाश कमी प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे वापरकर्ते त्यांच्या पसंतीच्या मल्टिमीडिया कंटेंटचा आनंद दीर्घकाळपर्यंत सुरक्षितरित्या लुटू शकतात.

प्रगत क्वाड-कॅमेरा सिस्टिम

वनप्लस ९आर ५जीच्या मुख्य कॅमेऱ्यात कस्टमाइज्ड ४८ एमपी सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर असून त्यामुळे वेगवान फोकस स्पीड्स, अधिक अचूक रंगसंगती आणि रात्रीच्या वेळेची अधिक चांगली फोटोग्राफी शक्य होते. इंटलिजंट मल्टीफ्रेम प्रोसेसिंगचा अंतर्भाव असलेल्या नाइटस्केप मोडमुळे तुमच्या शहरातील पसंतीच्या सिटीस्केपसारखी उजळ ठिकाणे अधिक स्पष्ट व तपशिलात दिसतात. वनप्लस ९आर ५जीमधील मुख्य कॅमेऱ्यात अधिक सक्षम ओआयएस असून त्यामुळे तीक्ष्ण आणि सुस्पष्ट अशा लाँग एक्स्पोजर शॉट्ससाठी अधिक इमेज स्टॅबिलिटी मिळते. ईआयएसमुळे व्हिडिओ फुटेजही लक्षणीयरित्या सुलभ असून व्हिडिओ पोर्ट्रेट मोडमुळे वापरकर्त्यांना खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक अनुभवासाठी अधिक चांगला बोकेह इफेक्ट मिळतो. डिव्हाइसमध्ये ५ एमपी मायक्रो लेन्सही असून, तपशीलवार व लेअर्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटोंसाठी स्वतंत्र मोनोक्रोम कॅमेरा मुख्य कॅमेऱ्याच्या बरोबरीने काम करतो.

डिझाइन

गेमर्सना अधिक काळापर्यंत डिव्हाइस हातात पकडणे सुलभ व्हावे, यादृष्टीने वनप्लस ९आर ५जी ची रचना राऊंडेड कॉर्नर पद्धतीची करण्यात आली असून उच्च प्रतीची साधनसामग्री आणि तपशीलवार व अचूक कौशल्य यांच्या संगमातून हे डिव्हाइस घडले आहे. फिल्मच्या फाइन लेअरमध्ये मिश्रित असा लेक ब्ल्यू कलरवेचा मायक्रो पॅटर्न असून कार्बन ब्लॅक या दुसऱ्या कलरवेमुळे अँटी-ग्लेअर ग्लास फिनिशसह विशिष्ट असा सिल्की स्मूथ हँड फील मिळतो.

वेगवान व स्मूथ ऑक्सिजन ओएस ११ आणि वार्प चार्ज

ऑक्सिजन ओएस ११ हे वनप्लस ९आर ५जी समवेत विनाअडथळा काम करता यावे, यादृष्टीने आमच्या समुदायाकडून आलेल्या सर्वोत्तम कल्पनांचे प्रतीक आहे. या माध्यमातून सर्वाधिक इंट्युटिव्ह, पर्सनलाइज्ड स्मार्टफोन अनुभवाचा आनंद घ्या. टर्बो बुस्ट ३.० मुळे वनप्लस ९आर ५जी मध्ये तुम्ही बॅकग्राउंडला पूर्वीपेक्षा २५ टक्के अधिक अॅप सुरू ठेवू शकता. रॅमवरील डाटाचे आकारमान लहान करणारे रॅम कम्प्रेशन आणि तुमच्या फोनमध्ये अधिक प्रत्यक्ष रॅम असावे, यासाठी फोन स्टोअरेजचे रॅममध्ये रुपांतर करणारे व्हर्च्युअल रॅम या दोन तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही हे साध्य केले आहे. अंतिमतः वनप्लसच्या सामर्थ्यवान वार्प चार्ज ६५ तंत्रज्ञानामुळे दिवसभरातील चार्ज अवघ्या १५ मिनिटांत होते आणि १ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत अवघ्या ३९ मिनिटांत चार्जिंग होते. चार्जिंगला लागणारा वेळ कमी करण्यासाठी ४५०० एमएएच क्षमतेच्या मोठ्या बॅटरीत सुधारित ड्युअल सेल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

कार्बन ब्लॅक आणि लेक ब्ल्यू रंगातील वनप्लस ९आर ५जी ३९,९९९ रुपये (८ + १२८ जीबी) आणि ४३,९९९ रुपये (१२ + २५६ जीबी) या किमतीला उपलब्ध आहे. अमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी amazon.in आणि वनप्लस रेड केबल क्लब सदस्यांसाठी oneplus.in व वनप्लस स्टोअर अॅप येथे १४ एप्रिल रोजी खरेदीसाठी उपलब्ध आहे. १५ एप्रिलपासून amazon.in, OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सक्ल्युजिव ऑफलाइन स्टोअर्स आणि पार्टनर आउटलेट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी OnePlus.in/9R येथे भेट द्या.

रेड केबल क्लब सदस्यांसाठी एक्सक्ल्युजिव ऑफर्स १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून

oneplus.in वर सकाळी ८ वाजल्यापासून पुढील ऑफर्ससर विक्रीला सुरुवात

वनप्लस ९ मालिकेवर विद्यार्थ्यांसाठी वनप्लस एज्युकेशन बेनिफिट्स अंतर्गत १ हजार रुपयांची थेट सवलत
एसबीआय कार्ड –क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय व्यवहारांवर २ हजार रुपयांची सवलत

वनप्लस एक्स्पिरिअन्स स्टोअर्समध्ये सदस्यांना पुढील लाभ मिळू शकतात –

वनप्लस ९ आणि वनप्लस ९आरसाठी अवघ्या ४९९ रुपयांत रेड केबल केअर प्लॅन उपलब्ध. या प्लॅनमध्ये रेड केबल प्रो प्लॅन्सअंतर्गत अलिकडेच वाढवण्यात आलेल्या क्लाउड स्टोअरेज क्षमतेअंतर्गत १२० जीबी क्लाउड स्टोअरेजचा समावेश
एसबीआय कार्ड – क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय व्यवहारांवर २ हजार रुपयांची सवलत

१५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ऑफर्स –

amazon.in, OnePlus.in, वनप्लस एक्स्पिरिअन्स स्टोअर्स, ऑथराइज्ड स्टोअर्स आणि पार्टनर स्टोअर्स येथे एसबीआय कार्ड – क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय व्यवहारांच्या माध्यमातून वनप्लस ९आर खरेदीवर २ हजार रुपयांची तात्काळ सवलत. याव्यतिरिक्त, amazon.in वर महत्त्वाच्या क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून आणि OnePlus.in व अन्य ऑफलाइन दुकानांमध्ये एसबीआय कार्ड – क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून वनप्लस ९आरच्या खरेदीवर सहा महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचा लाभ

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -