घरटेक-वेकफेक शॉपिंग साईटपासून सावधान! स्वस्त वस्तू घेण्याच्या नादात व्हाल कंगाल, असे राहा...

फेक शॉपिंग साईटपासून सावधान! स्वस्त वस्तू घेण्याच्या नादात व्हाल कंगाल, असे राहा सुरक्षित

Subscribe

नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व काही सोप्प झालं आहे. एकेकाळी शॉपिंगचा अर्थ बाजार होता, परंतु आजकाल घर बसल्या शॉपिंग केली जात आहे. ऑनलाईन शॉपिंग जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे सध्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या देखील सणासुदीच्या दिवशी सर्व वस्तूंवर सूट देऊन सेल ठेवतात. पण आता हॅकर्स याचा फायदा घेताना दिसत आहे. नकली वेबसाईटवर तयार करून आकर्षित करण्यासाठी वस्तूंवर सूट देत आहे आणि अशाप्रकारे लोकांकडून पैसे लुटत आहेत. त्यामुळे यापासून कसे सावध राहायचे हे तुम्हाला सांगणार आहोत.

इंटरनेटद्वारे खरेदी करण्यात जराशीही चूक झाली तरी ग्राहकांना याचे मोठे नुकसान भोगावे लागते. इंटरनेटवरील कमी किंमतीत सामान विकणाऱ्या वेबसाईटमध्ये फसून ग्राहक हॅकर्सचे शिकार होतात.

- Advertisement -

या साईटने हजारो भारतीयांना फसवले

Wellbuymall.com हे एक असे पोर्टल आहे, ज्याने हजारो भारतीयांना फसवले आहे. वेबसाईटने ग्राहकांना गॅजेट्स विक्रीचे लालच दाखवले आणि त्याचे पैसे भरल्यानंतर गायब होणे. ही वेबसाईट सध्या सरू नाही आहे. Wellbuymall.com च्या URLवर आता वापरकर्त्यांना एक चीनी मॅसेज दिसत आहे. ज्याचा अनुवाद असा होतो की, “Site Not Found. Your request did not find the corresponding site in the webserver!”

फेक शॉपिंग वेबसाईटपासून कसे सुरक्षित राहालं

  • तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून खरेदी करत असाल, तर त्यापूर्वी इंटनेटवरून कंपनीच्या वेबसाईटचे प्रमाणपत्र शोधा. तसेच अनेक ऑनलाईन पोर्टल कंपनी नोंदणी आणि त्याच्या वैध्यतेची माहिती पाहा.
  • कॉपीराईट पर्याय तपासा आणि व्हॅट आयडी पाहा.
  • वेबसाईटच्या होम पेजवर जा आणि काँटॅक्टवर क्लिक करा. जर तुम्हाला पत्ता, मोबाईल नंबर यासारखी माहिती मिळाली नाही, तर अशा वेबसाईटवर खरेदी करू नका.
  • वेबसाईट लिंकमध्ये HTTP चेक करा.
  • सूट आणि कॅशबॅक मिळत असल्यामुळे जास्त करून ग्राहक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर खरेदी करतात. जर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर कमी किंमतीत वस्तू मिळत असेल तर यात लक्ष द्या, यामध्ये काही फसवणूक होण्यासारखे आहे की नाही याची पडताळणी करा.

हेही वाचा – काय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -