कॅम स्कॅनरची जागा घेण्यासाठी आला मेड इन इंडिया अ‍ॅप

BITS Pilani आणि IIM बंगळूरूच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित हा App तयार केला आहे.

bharat scanner app launched as a truly indian camscanner alternative
कॅम स्कॅनरची जागा घेण्यासाठी आला मेड इन इंडिया अ‍ॅप

भारत सरकारने डेटा प्रायव्हसीची बाब लक्षात घेऊन एकूण ५९ चिनी Appsवर बंदी घातली. या Appsमध्ये टिकटॉक आणि कॅम स्कॅनर सारखे अनेक लोकप्रिय Appsचा समावेश होता. आता या Appsच्या जागी स्वदेशी Apps सध्या लाँच होत आहे. टिकटॉक सारखे अनेक स्वदेशी Apps लाँच झाले आहेत. आता कॅम स्कॅनची जागा घेण्यासाठी देखील स्वदेशी App लाँच झाला आहे. कॅम स्कॅनर सारखा भारत स्कॅनर App आला आहे.

भारत स्कॅनर या Appचा वापर करून युजर्स आपले डॉक्युमेंट वगैर स्कॅन करू शकतात. तसेच आपण PDF देखील कनव्हर्ट करू शकता. यामध्ये अनेक प्रकारचे फिल्टर्सचा देखील समावेश आहे. भारत स्कॅनरच्या वेबसाईटवरील दिलेल्या माहितीनुसार, या Appमध्ये तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो. हा App तुमचा डेटा तुमच्या फोनमध्ये ठेवतो. शिवाय यामध्ये ऑटो एज क्रॉपिंग सारखे फीचर्स देखील आहेत.

भारत स्कॅनर App फ्री असून तुम्ही गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. भारत स्कॅनरच्या वेबसाईटमध्ये लिहिले आहे की, हा App BITS Pilani आणि IIM बंगळूरूच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन तयार केला आहे. या विद्यार्थ्यांकडे १० वर्षांहून अधिक इंडस्ट्रींचा अनुभव आहे.

भारत सरकारने ५९ चिनी Appsवर बंदी घातली. यामध्ये TikTok, CamScanner, Shein, Clash Of Kings, UC Browser, Club Factory, NewsDog, Beauty Plus, We Chat आणि UC News सारखे लोकप्रिय Apps होते.


हेही वाचा – JioMeet विरोधात Zoom करणार कायदेशीर कारवाई?