घरटेक-वेकTikTok वर अशी होते कमाई, त्यामुळे १५ सेकंदच्या व्हिडीओकरता करतात काहीही

TikTok वर अशी होते कमाई, त्यामुळे १५ सेकंदच्या व्हिडीओकरता करतात काहीही

Subscribe

TikTok वर १५ सेकंदच्या व्हिडीओकरता लोक काहीही करतात.

भारतामध्ये टिक टॉक application हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तरूण पिढी या शॉर्ट व्हिडीओ Appच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे व्हिडीओ बनवतात. यामध्ये कोणी आपले टॅलेंट दाखवतात तर काही जण कॉमेडी करतात. तर काही जण लिपसिंग करुन व्हिडीओ अपलोड करतात. विशेष म्हणजे या व्हिडीओंना हजार नाहीतर लाखो लाइक्स मिळतात. दरम्यान, काही जण हे App बंद करण्याची मागणी करत आहेत. तर काही जण या Appला सपोर्ट करत आहेत. तुम्हीही कदाचित टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत असाल. आज आम्ही तुम्हाला या App विषयी माहिती सांगणार आहोत. हे नेमके काय App आहे आणि या Appची कमाई कशी केली जाते?

काय आहे टिकटॉक

टिकटॉक हे सोशल मीडियाचे application आहे. हे App स्मार्टफोनमध्ये डाऊनलॉड करुन त्याद्वारे १५ सेकंदचे व्हिडीओ बनवले जातात आणि ते शेअर केले जातात. हे चीन सोशल मीडिया App असून याची इतर देशात देखील तितकीच क्रेझ आहे. २०१९ मध्ये जगात whatsappनंतर टिकटॉक हे App सर्वात अधिक डाऊनलोड करण्यात आले आहे.

- Advertisement -

महिन्यात २० मिलियन लोक वापरतात टिकटॉक

भारतात टिकटॉक डाऊनलोड करण्याचा आकडा १०० मिलियन इतका आहे. तर इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार प्रत्येक महिन्यात २० मिलियन भारतीय नागरिक टिकटॉक डाऊनलोड करतात. विशेष म्हणजे टिकटॉकचा सर्वात जास्त वापर हा गाव खेड्यात केला जातो. तसेच टिकटॉकवर फॉलोअर्स आणि लोकप्रियतेच्या आधारावर ब्ल्यू टीक देखील दिला जातो.

पहिला मार्ग

- Advertisement -

ज्या व्यक्तींचे फॉलोअर्स जास्त आहेत. अशा व्यक्ती आपल्या युट्यूब आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर टिकटॉकची लिंक जोडू शकतात. यामुळे त्यांचे व्यूज अधिक वाढू शकतात. त्याचप्रमाणे युट्यूबद्वारे ते आपली कमाई देखील करु शकतात.

दुसरा मार्ग

ज्या व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. अशा व्यक्ती कंपनीला अप्रोच करु शकतात. एखादी कंपनी आपल्या ब्रँडची जाहिरात त्यांच्याद्वारे करु शकते. यामुळे त्या कंपनीला आणि टिकटॉक करणाऱ्या व्यक्तीला अधिक फायदा होतो. अशा व्यक्ती आपल्या व्हिडीओसोबत हॅशटॅगचा देखील वापर करतात.


हेही वाचा – Video: जगातील शेवटच्या तस्मानियन वाघाचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -