घरटेक-वेकभारतात २ डिसेंबरला येतेय नवी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

भारतात २ डिसेंबरला येतेय नवी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

Bounce Infinity Electric Scooter Launch Update : भारतात ओलानंतर आता इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी EV कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, EV कंपनी या वर्षी २ डिसेंबरला Bounce Infinity ही नवी स्कूटर लाँच करणार आहे. ज्याचे बुकिंग देखील त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर या स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी सुरू होईल. याशिवाय स्कूटरची बुकिंग रक्कम ४९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

‘या’ स्कूटरचे काही खास फिचर्स

कंपनीचा दावा आहे की, त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर ही मेड इन इंडिया आहे. ‘Battery as a service’ हे या स्कूटरचे एक वैशिष्ट्ये आहे. बाउन्स ही स्कूटर ग्राहकांना बॅटरीशिवाय खरेदी करता येईल. अशा प्रकारे पुढे जाण्यासाठी बाउन्सच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा वापर करते. हा पर्याय बॅटरीने सुसज्ज वाहन खरेदी करण्यापेक्षा स्कूटरला किमान ४० टक्के अधिक किफायतशीर बनवतो. म्हणजेच, ग्राहक नेहमीच्या स्कूटरप्रमाणे बॅटरी पॅक असलेली स्कूटरही खरेदी करू शकतात. यामध्ये एका स्मार्ट रिमूवेबल लि-आयन बॅटरीचा समावेश आहे जी बॅटरी ग्राहक त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार काढून चार्ज करू शकतात.

- Advertisement -

बाऊन्स इन्फिनिटी स्कूटरमध्ये राउंड हेडलॅम्प, रेट्रो-स्टाईल फ्रंट फेंडर, एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सिंगल पीस सीट, स्पोर्टी अलॉय व्हील, प्रॉमिनेंट ग्रॅब रेल आणि पॉइंटेड टेल लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही स्कूटर सिंगल-टोन कलर ऑप्शनमध्ये रिजील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बाउन्स इन्फिनिटी हब-माउंट मोटरचा वापर करते. स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ड्युअल रिअर सस्पेंशनसह दाखवण्यात आले आहे. याच्या दोन्ही टोकांना सिंगल डिस्क ब्रेक आहेत.

EV स्टार्टअपने जाहीर केले आहे की, २०२१ मध्ये कंपनीने 22Motors मधील १०० टक्के भागभांडवल सुमारे ७ मिलियन अमेरिकन डॉलरला विकत घेतले आहे. या करारांतर्गत ईवी कंपनीने भिवंडी, राजस्थानमधील 22Motors कंपनीचे उत्पादन प्रकल्प विकत घेतले आहे. यातून दरवर्षी १८०,००० स्कूटर तयार करण्याची क्षमता आहे. तर आगामी काळात दक्षिण भारतात आणखी एक प्लांट उभारण्याची त्यांची योजना आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -