बीएसएनएल ग्राहकांसाठी 4G चे नवे प्लान

अनेक आकर्षक ऑफर्ससह बीएसएनएल त्यांच्या ग्राहकासांठी 4G सेवा घेऊन येत आहे, काय आहेत ऑफर्स जाणून घेण्यासाठी वाचा.

BSNL 4G Coming soon
बीएसएनएल 4G

भारतात 4G मोबाईल डेटा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता एअरटेल आणि जिओ नंतर भारतीय दूरसंचार निगम म्हणजेच बीएसएनएल अधिकृतरित्या ग्राहकांसाठी 4G सेवा घेऊन येत आहे. मागील वर्षी कंपनीने जाहीर केल्या प्रमाणे 4G कार्यप्रणाली सुरवातीला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरु करण्यात येणार होती. मात्र ताज्या माहिती नुसार बीएसएनएल आणखी काही राज्यात आपली कार्यप्रणाली विस्तारीत करणार आहे. पुढील काही महिन्यातच ग्राहकांना बीएसएनएल 4G सेवा वापरता येणार आहे. महाराष्ट्र आणि केरळ नंतर गुजरातमध्ये बीएसएनएल चाचपणी करत आहे. आतापर्यत करण्यात आलेल्या सर्वेक्षणा नुसार गुजरात राज्यात ग्राहकांना २० एमबीपीएस स्पीड पर्यंतच्या इंटरनेट सुविधेचा आनंद घेता येणार आहे.

काय असतील ऑफर्स

१) आधीपासून बीएसएनएल सिम कार्ड धारकांना त्यांचे जुने सिम कार्ड बदलून नवीन 4G सिम कार्ड घेतल्यास आधिकचा मोबाईल डाटा मिळणार आहे.

२) नवीन सिम कार्ड घेणाऱ्यांना अल्पदरात बीएसएनलचे सिम कार्ड उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर २ जीबी पर्यंतचा मोबाईल डाटा मिळणार आहे.

३) बीएसएनल ग्राहकांसाठी केबल नेटची सूविधा देखील सूरु केली जाणार आहे. त्यासाठीचे अॅडवान्स बुकिंग बीएसएनल अॅपवर सूरु करण्यात आले आहे. 4G सिम कार्ड धारकांना त्यांच्या मोबाईलमध्ये 4G सोबतच २ जी सेवादेखील वापरता येणार आहे.

४) इतर कंपन्याच्या तुलनेत बीएसएनएलचे सेवा शुल्क काहीसे कमी असणार आहे. नविन सिम कार्ड धारकांना आपल्या सेवेत सामावून घेण्या बरोबरच नेटपॅकचे दर देखील कमी असणार आहेत.

केबल नेट

बीएसएनएल ग्राहकांना दरमाहा कमीत कमी ७७७ ते १६,९९९ रु. पर्यंत केबल नेटचे प्लान घेता येऊ शकतात. ग्राहकांना ७७७ रु १८ जीबीचा डाटा असलेला प्लान मिळणार आहे. तसेच २५ जीबी साठी १२७७ रु, ४० जीबी साठी २४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. १७० जीबी पर्यंतच्या प्लानचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या किंमती अंदमान निकोबारसाठी लागू होणार नाही.