घरटेक-वेकBSNL ने लाँच केला ७८ रुपयांचा प्लॅन, रोज मिळणार 3GB डेटा आणि...

BSNL ने लाँच केला ७८ रुपयांचा प्लॅन, रोज मिळणार 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग सुविधा

Subscribe

बीएसएनल कंपनीचा हा नवीन प्लॅन जाणून घ्या.

कोरोना विषाणूच्या दरम्यान सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना स्वस्त किंमतीत डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा दिली आहे.

काय आहे प्लॅन?

- Advertisement -

बीएसएनएलचा हा लाँच केलेला प्लॅन ७८ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधा दिली आहे. या प्लॅनची वॅलिडिटी आठ दिवसांची आहे. तसेच यामध्ये Eros Now एंटरटेनमेंट सर्व्हिसचे सब्सक्रिप्शन दिले आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये दिवसाला 3GB पूर्ण झाल्यावर ऑपरेटर याची स्पीड कमी करून 40 kbs करतो.

२४७ रुपयांचाही प्लॅन लाँच

- Advertisement -

याशिवाय कंपनीने एक महिन्याचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत २४७ रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3GB डेटा आणि १०० एसएमएस रोज करण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. याची वॅलिडिटी ३० दिवसांची आहे.

वर्षभरासाठी १९९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभरासाठी रोज 3GB डेटा मिळतो. तसेच १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा, शिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त Eros Now एंटरटेनमेंट सर्व्हिसच सब्सक्रिप्शन पण दिले आहे.

ब्रॉडबँड प्लॅनची वॅलिडिटी वाढवण्याचा घेतला निर्णय

कंपनीने आपल्या 300GB च्या ब्रॉडबँड प्लॅन CS337 ची सप्टेंबरपर्यंत वॅलिडिटी वाढविली आहे. पूर्वी याची वॅलिडिटी १० जूनपर्यंत होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40Mbps स्पीडसोबत 300GB डेटा मिळतो.


हेही वाचा – सॅमसंगचा Galaxy Tab S6 Lite भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -