घरटेक-वेकSamsungच्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

Samsungच्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

Subscribe

सॅमसंगचा (Samsung) स्मार्टफोन किंवा वेअरेबल वस्तू घेण्याची इच्छा असेल, तर चांगली संधी गमावण्याची चुक करू नका. ई-कॉमर्स साइट् Amazon वर सुरू असलेल्या सेल दरम्यान कंपनीच्या फ्लॅगशिप, मिड-रेंज स्मार्टफोन आणि वेअरेबलवर स्पेशल फेस्टिव्ह (सणाच्या) ऑफर उपलब्ध आहेत. Amazon ग्रेट इंडिया सेल दरम्यान गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी घड्याळ आणि गॅलेक्सी टॅबवर शानदार ऑफर्स आणि डिल्स मिळत आहेत. यापैकी काही तुमच्या माहितीसाठी घेऊन आलो आहोत, जाणून घ्या.

7000mAh पावरफुल बॅटरीसोबत आलेला Galaxy M51 वर २ हजार रुपयांची सूट मिळत आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट मधील हा फोन २२ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे 6000mAh मोठी बॅटरी आणि sAMOLED डिस्प्लेसह येत असलेला Galaxy M31s आणि Galaxy M21वर १ हजार रुपये सूट मिळत आहे. हे फोन नो-कॉस्ट ईएमआयसह खरेदी करू शकता.

- Advertisement -

गॅलेक्सी टॅब रेंजवरही मोठी सूट

Galaxy M31 Prime Edition स्मार्टफोनसह ३ महिन्यांसाठी Amazon Prime चे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. याशिवाय गॅलेक्सी टॅबलेट्सवर १ हजार रुपयांची सूट दिली आहे. ज्यानंतर ग्राहक Galaxy Tab A7 Wi-Fi ला १६ हजार रुपये, Galaxy Tab A 10.1ला १३ हजार ९९ रुपये आणि Galaxy S6 Liteला २६ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करून शकता. यावर अनेक बँक ऑफर्सचा फायदा देखील मिळत आहे.

गॅलेक्सी वॉचवर ९ हजार ५०० रुपयांची सूट

जर तुम्हाला सॅमसंगचा वेअरेबल डिव्हाईस खरेदी करायचे असल्यास Galaxy Watch 4G LTE सेल दरम्यान ९ हजार ५०० रुपयांवर सूट मिळत आहे. हे वेअरेबल Amazon सेलमध्ये तुम्ही १७ हजार ९९० रुपयांमध्ये स्पेश प्राइसवर खरेदी करू शकाल. याशिवाय ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआईचा पर्याय या वॉचवर दिला आहे. HDFC बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यावर ग्राहकांना १० टक्के इंस्टंट कॅशबॅक पण Amazon देत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सणासुदीच्या काळात बाईक घेण्याची सुवर्णसंधी; HERO देतेय बंपर ऑफर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -