घरटेक-वेक'TikTok करलो मुठ्ठी मे', रिलायंस करु शकते टिकटॉकमध्ये गुंतवणूक

‘TikTok करलो मुठ्ठी मे’, रिलायंस करु शकते टिकटॉकमध्ये गुंतवणूक

Subscribe

भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर Tik Tok सहीत ५९ Apps वर बंदी घालण्यात आली होती. कोट्यवधी युजरबेस असलेल्या टिकटॉकसाठी हा मोठा धक्काच होता. त्यानंतर अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर टिकटॉकची मातृसंस्था असलेल्या ByteDance ने चीन बाहेर आपले मुख्यालय आणि गुंतवणूक हलविण्याचा निर्णय घेतला. आता Tik Tok च्या भारतीय गुंतवणूकीत Realiance Industries गुंतवणूक करु शकते असे सांगण्यात येत आहे. TechCrunch ने दिलेल्या बातमीनुसार याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र या चर्चेला अंतिम स्वरुप अद्याप मिळाले नाही.

ByteDance आणि Realiance कडून अद्याप या विषयावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. टिक टॉकच्या एकूण युजर्सपैकी ३० टक्के युजर्स हे भारतीय आहेत. तर टिकटॉकच्या एकूण उत्पन्नापैकी १० टक्के उत्पन्न एकट्या भारताकडून होत आहे. एप्रिल २०२० पर्यंत गुगल प्ले स्टोअर आणि Apple App स्टोअरवरुन टिकटॉकचे २ अब्ज डाऊनलोड पुर्ण झाले होते. त्यापैकी ६१ कोटी डाऊनलोड भारतात झालेले आहेत.

- Advertisement -

मोबाईल इंटेलिजन्स कंपनीने काढलेल्या अनुमानानुसार टिकटॉक डाऊनलोड करण्यात भारताने चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये केवळ १९.६६ कोटी टिकटॉकचे डाऊनलोड झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -