घरटेक-वेकनेटवर्क शिवाय करता येणार iphone13मधून कॉलिंग आणि मेसेजिंग, जाणून घ्या अधिक माहिती

नेटवर्क शिवाय करता येणार iphone13मधून कॉलिंग आणि मेसेजिंग, जाणून घ्या अधिक माहिती

Subscribe

तुमचा फोन थेट सॅटेलाईटशी जोडला जाईल

iphone13 सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंगच्या आधीच iphone13 विषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. iphone13 मॉडेल सॅटलाईट कम्युनिकेशन मोड कनेक्टिव्हिटीने तयार केली आहे. Chi kuoने याबद्दल खुलासा केला आहे. iphone13 मध्ये असे फिचर देण्यात आले आहेत ज्यात 4G किंवा 5G कनेक्टिव्हिटीशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग करता येणार आहे. काय आहे ही सॅटलाइट कनेक्टिव्हिटी आणि iphone13 मध्ये आणखी कोणते नवीन फिचर्स आहे जाणून घ्या.

- Advertisement -

LEO सॅटेलाईट पृथ्वीच्या खालील कक्षेतमधील एक स्थित कनेक्टिव्हिटी आहे. ज्यात टॉवर कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात आलेला नाही. यात तुमचा फोन थेट सॅटेलाईटशी जोडला जातो. Elon Muskची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस starlink चे यात नाव येते.

- Advertisement -

द वर्जच्या रिपोर्टनुसार, iphone13 मध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसाठी Qualcommचे कस्टमाइज X60 बेसबॅंड चिपचा वापर करण्यात आला आहे. एका अमेरिकन बेस्ड कम्युनिकेशन कंपनीच्या वतीने सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी सुविधेची ऑफर देण्यात येते. ज्यात अपकमिंग iphone13 सीरीजच्या स्मॉर्टफोनला कनेक्ट करण्यात येईल.

रिपोर्टनुसार अँपलच्या वतीने सॅटेलाईट कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सर्विसला ऑप्टिमाइज्ड करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर स्मॉर्टफोन कंपन्यांकडून देखील सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीचा वापर केला जाऊ शकतो. पुढील काळात अँपल सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी सादर करणारा पहिला स्मॉर्टफोन ब्रँड होऊ शकतो.


हेही वाचा – JioPhone Next स्मॉर्टफोनचे प्री-बुकिंग पुढील आठवड्यात सुरू होणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -