घरCORONA UPDATEसावधान; मोबाईलमधील कोविड App तुमचे पैसे चोरी करु शकतात

सावधान; मोबाईलमधील कोविड App तुमचे पैसे चोरी करु शकतात

Subscribe

कोरोना व्हायरसच्या महामारीसंदर्भात माहिती देणारे मोबाईल App जर तुम्ही डाऊनलोड केले असतील तर सावधान.. कारण हे App तुमची खासगी माहिती वापरून तुमच्या बँक खात्याला मोकळं करु शकतात, केंद्रीय गुन्हे अन्वेषन (CBI) विभागाने याबाबत इशारा दिला आहे.

सीबीआयने, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. “हे App मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर फिशिंगच्या माध्यमातून ते तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती गोळा करतात. त्यानंतर त्या कार्डच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यामधील रक्कम चोरतात.”

- Advertisement -

इंटरपोलने दिलेल्या इनपुटच्या आधारावर सीबीआयने फिशिंग सॉफ्टवेअर सेर्बसच्या बाबतीत माहिती दिली आहे. हे सॉफ्टवेअर मोबाईल वापरकर्त्यांना कोविड १९ संबंधी एसएमएस पाठवते. या SMC मध्ये Malicious लिंक डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये ट्रोजन प्रवेश करतो. हा ट्रोजन तुमच्या मोबाईलमधील फायनान्शियल डेटा चोरण्याचे काम करतो.

सध्या जगभरात कोरोनाची महाभयंकर महामारी पसरल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या भीतीचा फायदा उचलून काही जण लोकांना लुटण्याचे काम करत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक सध्या इंटरनेटवर माहितीच्या शोधात असतात. आपल्या मोबाईलमध्ये विविध Apps डाऊनलोड करुन कोरोनाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आपण अपडेट राहण्याच्या नादात चोराच्या हातात कोलित तर देत नाहीत, याचा विचार एकदा करावा लागेल.

- Advertisement -

आरोग्य सेतू APP चांगला पर्याय

इंटरनेटवरुन भलते सलते App डाऊनलोड करण्यापेक्षा भारत सरकारचे अधिकृत असलेले आरोग्य सेतू App कधीही चांगले. आरोग्य सेतू App बद्दलही मध्यंतरी हॅक झाल्याची अफवा उडाली होती. मात्र केंद्र सरकारने ही शक्यता फेटाळून लावत हे App सुरक्षित असल्याचे सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -