घर टेक-वेक तीन लाखात घ्या ही कार

तीन लाखात घ्या ही कार

Subscribe

तुम्हाला कार खरेदी करायची आहे पण बजेट कमी आहे. काही चिंता करु नका. कमी बजेटमध्ये देखील तुम्ही चांगली कार खरेदी करु शकता. ही कार आहे डॅटसनची रेडी गो. भारतीय बाजारामध्ये डॅटसनने कमी किमतीच्या मोटारींमध्ये आपला ठसा उमटविला आहे. ही कंपनी मध्यमवर्गीय कुटूंबाचे बजेट लक्षात घेऊन कार बनवते. कंपनीच्या डॅटसन रेडी गोचे (Datsun Redi Go) बेस मॉडेल म्हणजेच डी व्हेरिएंट पेट्रोल ३ लाख १५ हजार रुपये तुम्ही खरेदी करू शकता.

डॅटसनच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही कार एका लिटर पेट्रोलवर २२ किमीचे मायलेज देते. जर आपण तीन लाख रुपयांमध्ये छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण ही कार खरेदी करू शकता. कंपनी या कारवर ३५ हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे. डॅटसनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या ऑफरअंतर्गत ग्राहकांना १५,००० रुपये रोख सूट आणि १५,००० पर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनसही दिला जात आहे.

- Advertisement -

ही 5 सीटर कार आहे. त्याचं इंजिन 67 bhp पॉवर आणि 104 Nm टॉर्क जनरेट करते. डॅटसन गोच्या तीन पेट्रोल व्हेरिएंटमध्ये (डी, ए, टी) 799 cc इंजिन आहे. यात व्हील कव्हर्स, ड्रायव्हर एअर बॅग, पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते.

डी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत २.८६ लाख, ए व्हेरिएंटची किंमत ३.६१ आणि टी व्हेरिएंटची किंमत ३.८४ लाख रुपये आहे. तिन्ही प्रकारांमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. या तीन कारमधील बूट स्पेस २२२ लिटर आहे. स्वयंचलित हवामान नियंत्रण (Automatic weather control), फॉग लाइट्स – फ्रंट आणि पॉवर विंडो रियर मिळत नाही.


- Advertisement -

हेही वाचा –  अरे व्वा! आता चालता फिरता Air Charge होणार मोबाईल फोन


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -