स्वस्त वनप्लस झेड जुलैमध्ये लाँच होणार

one plus z
Credit- Twitter/ Max J.

वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी लवकरच आपला स्वस्तातला स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोनची किंमत वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रोपेक्षा कमी असेल. वनप्लस झेड असं या फोनला नाव दिलं आहे. कंपनी जुलैमध्ये हा फोन बाजारात आणणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वनप्लस फ्लॅगशिपच्या लाँचिंगच्या वेळी, अनेक चाहत्यांनी अशी अपेक्षा केली होती की स्वस्त वनप्लस 8 लाइटला देखील लाँच केलं होईल. मात्र, चाहत्यांच्या पदरी निराशाच आली. तरी. दरम्यान, कंपनीने हा स्वस्तातला वनप्लस झेडच्या लाँचिंगची तारीख नक्की केली आहे.

वनप्लस ८ सिरीजची भारतात प्री-बुकिंग सुरू

वनप्लस ८ सिरीजसाठी भारतात प्री-बुकिंग २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने २८ एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वनप्लस ८ सिरीजसाठी भारतात प्री-ऑर्डर मध्यरात्रीपासून सुरू केली जाईल. ग्राहक वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो या दोन्ही मॉडेल साठी प्री-बुकिंग करू शकतात.


हेही वाचा – ‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत