घरटेक-वेकदेशातील सर्वात स्वस्त कार, किंमत ५ लाखाहूनही कमी

देशातील सर्वात स्वस्त कार, किंमत ५ लाखाहूनही कमी

Subscribe

नवं वर्ष सुरू होताच गाडीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता आलिशान, ५-६ जण बसतील अशा गाड्या घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. एकीकडे गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली असली तरी लोकं गाड्या खरेदी करत आहेत. तुम्ही देखील गाडी घेण्याच्या विचारात आहात आणि ५-६ जण बसतील अशी गाडी घ्यायची आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशा ५ सीटर कार घेऊन आलो आहोत ज्यांचं बजेट ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तर मग जाणून घेऊया या कोणत्या कार आहेत आणि काय वैशिष्ट्य या गाडींची आहेत.

डॅटसन गो (Datsun Go) : डॅटसन गो या गाडीला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. गाडीला 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. 75.94 Hp मॅक्सिमम पॉवर आणि 104 Nm टॉर्क जनरेट करते. ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन पर्यायांसह कार उपलब्ध आहे. BS6 Datsun Go 19.02 kmpl आणि CVT मध्ये 19.59 kmpl मायलेज देते. भारतात आपण BS6 Datsun Go ४.०२ लाख (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी करू शकता.

- Advertisement -

रेनो क्विड बीएस 6 (Renault Kwid BS6) : रेनो क्विड बीएस 6 मध्ये 1.0 लीटर 3 सिलिंडर, पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे जास्तीत जास्त 68 Hp आणि 91 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 21-22 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. रेनो क्विड बीएस 6 ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 3.12 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio) : मारुती सुझुकी सेलेरिओ ही भारतात लोकप्रिय असलेल्या मोटारींपैकी एक आहे. कारमध्ये 998 सीसी बीएस 6 कम्पिलियंट इंजिन दिले गेले आहे जे 6000 RPM वर 50 kW आणि 3500 RPM वर 90 Nm टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी सेलेरिओची लांबी 3695 mm, रुंदी 1600 mm, उंची 1560 मिमी, व्हीलबेस 2425 mm, वजन 1250 किलो आणि इंधन क्षमता 35 लिटर आहे. ही कार छोट्या कुटुंबासाठी योग्य आहे. गाडीची किंमत 4.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

- Advertisement -

मारुती एस-प्रेसो (Maruti S-Presso) : इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत कंपनीने मारुती एस-प्रेसोमध्ये 998 cc 3 सिलेंडरचे K10B पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 55,00 rpm वर 67 BHP जास्तीत जास्त उर्जा आणि 35,00 RPM वर 90 Nm ची पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय आहे. जर मायलेजबद्दल बोलायचे झालं तर मारुती एस-प्रेसो 1 लिटर पेट्रोलमध्ये 21.4 किमी मायलेज देते. कारची किंमत 3.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -