Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Jio Phone साठी सर्वात स्वस्त प्लान; ४० रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा अनलिमिटेड...

Jio Phone साठी सर्वात स्वस्त प्लान; ४० रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा अनलिमिटेड कॉलिंग!

Related Story

- Advertisement -

जिओ प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत आजही स्वस्त आहेत. तुम्ही त्याची तुलना ८४ दिवसाच्या प्लानशी किंवा महिनाभराच्या कोणत्याही प्लानशी केली तरीही जिओच्या प्लानचे दर स्वस्त दिसतील. जिओचे प्री-पेड प्लानचे दोन प्रकार आहेत ज्यात एक स्मार्टफोनसाठी आहे तर दुसरा जिओ फोनसाठी आहे. स्मार्टफोनच्या तुलनेत जिओ फोनचा प्लान खूपच स्वस्त आहेत. जाणून घ्या Jio फोनच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल …

जिओ फोनसाठी सर्वात स्वस्त प्लानची किंमत ३९ रुपये आहे. जिओ फोनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये १४०० एमबी इंटरनेट देखील उपलब्ध आहे. जिओ फोनच्या ३९ रुपयांच्या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे म्हणजे तुम्हाला दररोज १०० एमबी इंटरनेट वापरता येणार आहे. डेटा संपल्यानंतर इंटरनेट 64 केबीपीएसच्या वेगाने ग्राहकांना वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला स्मार्टफोन प्लॅनसारख्या सर्व जिओ अ‍ॅप्सची सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.

- Advertisement -

जिओ फोनसाठी 69 दिवसांचा प्लान देखील आहे, जो 14 दिवसांची वैधता देतो. या प्लानमध्ये 500MB डेटा उपलब्ध आहे. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह, सर्व Jio अॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. जिओ फोनच्या 28 दिवसांच्या प्लानची किंमत 75 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 500MB डेटा + 200MB अतिरिक्त डेटा देखील मिळणार आहे. जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही 155 रुपयांचे रिचार्ज करू शकता. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल आणि दररोज 1 जीबी डेटा उपलब्ध असेल. हा प्लान देखील, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -