घरटेक-वेकKYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते साफ

KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते साफ

Subscribe

कोणत्याही अकाउंट होल्डरला अशाप्रकारचे मेसेज,मेल, फोन किंवा कोणतीही लिंक आल्यास त्यापासून सावध रहा

बँकेचे सर्व व्यवहार गेल्या काही काळापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. KYC अपडेट प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुरु आहे. मात्र या KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते रिकामी करण्याचे काम सुरू आहे. KYC अपडेट करणार असल्याचे सांगत फ्रॉड झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. (Customer fraud under Online KYC Updation SBI alert customer)  कोरोना काळात अशाप्रकारच्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वृद्ध व्यक्तींना ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात ट्रॅप करण्यात येत असून खोटी माहिती सांगून त्यांच्याकडून संपूर्ण डिटेल्स घेऊन बँक खाते रिकामे करण्यात येत आहेत. या वाढत्या सायबर क्राइमच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्टेंट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

बँकेच्या एका ग्राहकाला KYC Updation साठी फोनवर आलेला मेसेज त्याने SBI ला ट्विट करत ऑनलाईन फ्रॉड होत असल्याची माहिती दिली. या ट्विटला उत्तर देत SBI ने कोणत्याही अकाउंट होल्डरला अशाप्रकारचे मेसेज,मेल, फोन किंवा कोणतीही लिंक आल्यास त्यापासून सावध रहा असा इशारा दिला. ऑनलाईन फसवणूक कशी केली जाते? अशाप्रकारचा फ्रॉड झाला तर त्याची तक्रार कुठे करायची? यासारख्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची? जाणून घ्या.

- Advertisement -

कशाप्रकारे होतेय फसवणूक?

फ्रॉड करणारे लोक आपण SBI कर्मचारी,पोलीस किंवा केव्हायसी अधिकारी असल्याचे सांगून ग्राहकांशी एखाद्या अनोळखी क्रमांकावरुन ग्राहकांना फोन कॉल्स, मेसेज,मेल किंवा लिंकद्वारे संपर्क साधतात. ऑनलाईन KYC अपडेट करा असे सांगितले जाते. त्यातून तुमचे संपूर्ण बँक डिटेल्स घेऊन बँकेचे खाते निकामी केले जाते.

कुठे तक्रार कराल?

  • आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यास किंवा अशाप्रकारे कोणतेही मेसेज,ईमेल किंवा फोन कॉल्स आल्यास त्याची तक्रार [email protected] किंवा https:\\cybercrime.gov.in वर दाखल करू शकता.
  • त्याचप्रमाणे १५५२६० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करु शकता.
  • लोकल एन्फोर्समेंटमध्ये ही फसवणूकीची तक्रार दाखल करू शकता.

काय काळजी घ्याल?

  • कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा ई मेलवर क्लिक करु नका.
  • समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कोणतेही अँप डाउनलोड करायला सांगितल्यास करू नका.
  • अनोळखी फोन कॉल्स, मेसेज, ईमेल वर आपली बर्थ डेट, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युझर आयडी,पासवर्ड आणि डेबिट कार्ड पिन,ओटीपी अशाप्रकारची माहिती कोणालाही देऊ नका.

    हेही वाचा – मेडल्सची संख्या सांगितली नाही; ॲपल सिरीवर चीन विरोधी पक्षपातीपणाचा आरोप

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -