घरटेक-वेक'ऑनलाईन बँकिंग' आता अधिक सुरक्षित!

‘ऑनलाईन बँकिंग’ आता अधिक सुरक्षित!

Subscribe

ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येतो, त्या प्रक्रियेतील सुरक्षा अधिक वाढवण्यात  घेण्यात येणार असल्याचंही संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

बँकेचे ऑनलाईन व्यवहार करताना होणारी फसवणूक तसंच ऑनलाईन हॅकिंग करुन केल्या जाणाऱ्या फ्रॉडच्या अनेक घटना आजवर उघडकीस आल्या आहेत. यावर निर्बंध लावण्यासाठी आता अर्थ मंत्रालयाने काही ठोस पावले उचलली आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरतल्या जवळपास सर्व बँकेच्या Apps ना तसंच ऑनलाईन सेवांना सायबर सुरक्षा सेलशी जोडण्यात येत आहे. सरकारी बॅंक तसंच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन बँकिंग व्यवहार सुरक्षा सायबर सेलशी जोडल्यामुळे हॅकिंगचा धोका टळणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सरकारचा हा निर्णय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यासांठी दिलासादायक असल्याचं म्हणावं लागेल.

ऑनलाईन बँकिंग सुरक्षित करण्यासाठी…

दरम्यान बँक ऑफ बडोदाचे संचालक गोपाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या देशभरातील सर्वच शाखा (ब्रँच) केंद्रिय सुरक्षा प्रणालीशी जोडल्या जातील. त्यामुळे बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये एखादा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन गैरव्यवहार झाल्यास किंवा संशयास्पद ट्रांझॅक्शन झाल्यास ही प्रणाली (सिस्टीम) त्वरित त्याविषयी अलर्ट देईल. त्यामुळे योग्यवेळी हॅकिंग आणि फ्रॉडवर आळा घालणं शक्य होईल. याशिवय ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येतो, त्या प्रक्रियेतील सुरक्षा अधिक वाढवण्यात  घेण्यात येणार असल्याचंही संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

काय घ्याल काळजी ?

तुम्हीही ऑनलाईन बॅंकिंग करत असाल तर पुढील काही गोष्टींची काळजी जरुर घ्या : निनावी व्यक्तीशी आपले बँक डिटेल्स शेअर करु नका. तुमचे पर्सनल डिटेल्स (आधारकार्ड नंबर, पॅन नंबर, बँक अकाउंट नंबर. बर्थ डेट, मोबाईल नंबर, एटीएम पीन नंबर इ.) नवख्या व्यक्तीशी शेअर करु नका. SMS द्वारे आलेल्या एखाद्या ऑफरला भुलून जाऊ नका. एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्या बँक अकाउंटशी संबंधित कोणतीही माहिती दिल्यास, त्यावर विश्वास ठेवता तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -