घरटेक-वेकतुमच्याही Mobile ची बॅटरी लवकर संपते ? त्वरित बंद करा 'या'...

तुमच्याही Mobile ची बॅटरी लवकर संपते ? त्वरित बंद करा ‘या’ सेटिंग्ज

Subscribe

तुम्ही जर फोनचे व्हायब्रेशन मोड ऑन ठेवले असेल तर तुमच्या फोनमध्ये बॅटरीची समस्या असू शकते. कारण रिंग टोनच्या तुलनेच व्हायब्रेशन जास्त बॅटरी वापरते.

स्मॉर्टफोन वापरणाऱ्या अनेकांना बॅटरी बॅकअप ही मोठी समस्या आहे. अनेक लोकांच्या फोनची बॅटरी दिवसभरही टिकत नाही. लोकांना दिवसातून दोन दोन वेळा फोन चार्ज करावा लागतो. तुमच्याही फोनची बॅटरी लवकर संपते का? याचे काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडतो.

मार्केटमध्ये आता फास्ट चार्जिंग आणि मोठी बॅटरी बॅक अप वाले फोन आले आहेत. परंतु आपल्या जुन्या स्मॉर्टफोनची बॅटरी लाईफ कमी होत आहे. तुम्हाला नवीन फोनची गरज नाहीये पण फोन सतत चार्ज करावा लागत असेल काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या बॅटरीची लाईफ वाढवू शकता. ते कसं ? जाणून घ्या डिटेल्स.

- Advertisement -

फोनचे व्हायब्रेशन

तुम्ही जर फोनचे व्हायब्रेशन मोड ऑन ठेवले असेल तर तुमच्या फोनमध्ये बॅटरीची समस्या असू शकते. कारण रिंग टोनच्या तुलनेच व्हायब्रेशन जास्त बॅटरी वापरते. अनेक जण टायपिंग आणि टचसाठी ही व्हायब्रेशनचा वापर करतात. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपू शकते. तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी फोनचे व्हायब्रेशन मोड ऑफ करा.

हे फिचर्स बंद करा

अनेक जण, ब्लूटूथ, GPS, Wifi, Mobile Data सारखे फिचर्स ऑन ठेवतात. हे फिचर्स जास्त बॅटरी वापरतात. जे फिचर्स तुम्ही वापरत नाही ते लगेचच बंद करा. हे फिचर्स तुमच्या फोनची बॅटरी जास्त वापरतात त्यामुळे फोनची बॅटरी वाचवण्यासाठी हे फिचर्स ऑफ करा.

- Advertisement -

ऑटो सिंक करा ऑफ

Gmail, Twitter, What’s App सारखे Apps आपण सतत वापरतो. हे Apps सतत रिफ्रेश होत असतात. ज्यामुळे युझर्सना लेटेस्ट अपडेट मिळत राहतात. परंतु या Apps मुळे जास्त बॅकेंड डेटा असल्याने फोनची बॅटरी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे यापैकी कोणते Apps तुम्ही वापरत नसाल तर ते लगेचच बंद करा. त्यानंतर गूगल अकाऊंट आणि ऑटो सिंक ऑप्शन्स देखील बंद करा.

ऑलवेज ऑन डिस्प्ले करा बंद

जर तुम्ही ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर वापरत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी सामान्य वापरापेक्षा जास्त वापरुन लवकर संपेल. या फिचरमुळे आपल्याला फोनवर येणारे महत्त्वाचे डिटेल्स लगेचच कळतात पण यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे फोनची डिस्प्ले सेटिंग्ज लगेचच ऑफ करा.


हेही वाचा – Apple Down : ॲपलच्या सेवा काही काळ ठप्प; App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -