घरटेक-वेकRBIच्या नव्या पॉलिसीमुळे Amazon Primeवर एक महिन्याचे सबस्क्रिप्शन झाले बंद

RBIच्या नव्या पॉलिसीमुळे Amazon Primeवर एक महिन्याचे सबस्क्रिप्शन झाले बंद

Subscribe

आता युझर्सना थेट ३ महिन्याचे किंवा १ वर्षांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार

Amazon prime हे ओटीटी माध्यम युझर्ससाठी परवडणारे प्लॅटफॉर्म आहे. कारण केवळ १२९ रुपयांच्या महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर युझर्सला अनेक गोष्टी पाहता येत होत्या. मात्र आता Amazon prime चे महिन्याचे सबस्क्रिप्शन बंद करण्यात आले आहे. हा सबस्क्रिप्शन प्लॅन RBIच्या नव्या गाइडलाइन्समुळे काढून टाकण्यात आला आहे.(one month subscription on Amazon Prime has been stop)  RBIच्या नव्या गाइडलाईननुसार, बँक आणि फाइनान्शिअल इस्टिट्यूशनच्या ऑथेंटिकेशनसाठी अँडिशनल फॅक्टर काढून टाकले जाणार आहे. या अँडिशनल फॅक्टर ऑनलाईन ट्राजेक्शनसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यत गाइडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे आता युझर्सना थेट ३ महिन्याचे किंवा १ वर्षांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

Amazonने त्यांचे सपोर्ट पेजही अपडेट केले आहे. ज्यात Amazon Prime चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन मेंबरशिप बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २७ एप्रिलपासून Amazonने नवीन मेंबर्सना फ्री ट्रायल देणेही बंद केले आहे. त्यामुळे आता युझर्स Amazon Prime घेत असेल किंवा रिनिव्ह करत असेल तर त्याला थेट तीन किंवा १ महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. Amazonच्या तीन महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी ३२९ रुपये तर १ वर्षांच्या सबस्क्रिप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

२०१९मध्ये पहिल्यांदा RBI फ्रेमवर्क घोषित करण्यात आले होते. या गाइडलाईन्स वाढवून आता ३० सप्टेंबर करण्यात आले आहे. RBI फ्रेमवर्कने २०१९मध्ये Recurring ट्राजेक्शनसाठी २ हजार रुपयांपर्यंतचे लिमिट ठेवले होते. त्यानंतर गेल्या वर्षीच प्रति मिनीट ट्राजेक्शनसाठी ५ हजार रुपयांपर्यंतचे लिमिट सेट केले होते.


हेही वाचा – Airtel Thanks Appवर खरेदी करा २४ कॅरेट सोनं, एअरटेल पेमेंट बँकेने लाँच केला Digigold प्लॅटफॉर्म

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -