Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक फक्त ३ लाखात इलेक्ट्रिक कार, टेस्लापेक्षा अधिक होतेय विक्री

फक्त ३ लाखात इलेक्ट्रिक कार, टेस्लापेक्षा अधिक होतेय विक्री

Related Story

- Advertisement -

इलेक्ट्रिक कार म्हटलं तर पहिलं नाव येतं ते म्हणजे टेस्ला (टेस्ला) कंपनीचे येतं. टेस्लाची इलेक्ट्रिक कार जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु आता एक चिनमधील छोटी कंपनी टेस्लाला आव्हान देत आहे. चीनची वाहन निर्माता कंपनी SAIC ची लहान इलेक्ट्रिक कार Hong Guang गेल्या काही महिन्यांपासून टेस्लाला कठोर स्पर्धा देत आहे. एवढेच नव्हे तर विक्रीच्या बाबतीतही चिनी कंपनीने मिनी इलेक्ट्रिक विभागात टेस्लाला मागे टाकले आहे.

Hong Guang MINI EV जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे. विक्रीच्या आकडेवारीकडे पाहता, कंपनीने टेस्ला मॉडेल ३ (Tesla Model 3) इलेक्ट्रिक सेडानलाही मागे पाडलं आहे. हाँग गुआंग मिनी कार आता जगात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे.

- Advertisement -

आकडेवारीवर नजर टाकल्यास जानेवारी २०२१ मध्ये मिनी कार हाँग गुआंगच्या एकूण ३६,००० युनिट्सची विक्री झाली, तर टेस्लाच्या मॉडेल ३ इलेक्ट्रिक कारच्या २१,५०० युनिट या काळात विकल्या गेल्या. फेब्रुवारीमध्ये या चिनी कंपनीने टेस्लाला मागे टाकले. फेब्रुवारीमध्ये हाँग गुआंगने एकूण २०,००० मोटारी विकल्या, तर टेस्ला मॉडेल ३ ने फक्त १३,७०० वाहनांची विक्री केली.

वास्तविक, चिनी कार हाँग गुआंगच्या या यशामागील पुष्कळ खास कारणं आहेत. एक, कारची असलेली किंमत अत्यंत कमी आहे आणि लूक खूपच आकर्षक आहे. तथापि, टेस्ला मॉडेल३ आकार, ड्रायव्हिंग रेंज आणि परफॉर्मंसच्या बाबतीत उजवी आहे. परंतु कमी किंमतीमुळे, हाँग गुआंग मिनी ईव्हीची मागणी सतत वाढत आहे.

- Advertisement -

कंपनीचा असा दावा आहे की हाँग गुआंग इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये १७० किलोमीटर एवढं मायलेज देतं आणि कारचा वेग ताशी १०० किलोमीटर आहे. या EV ला 13 kWh क्षमतेची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. चीनच्या छोट्या कारची किंमत २८,८०० युआन आहे, जी सुमारे ३,२०,००० रुपये आहे. तर टेस्ला मॉडेल 3३ ची प्रारंभिक किंमत २७,७२,००० रुपये आहे.

 

- Advertisement -