डेटा पुरवा, अन्यथा करार रद्द; एलॉन मस्क यांचा ट्विटरला इशारा

एलॉन मस्कने ट्विटरला पत्राद्वारे इशारा दिला आहे. तसेच, त्यांच्या वकिलानेही पत्र लिहून ट्विटरला अधिकारांची जाणीव करून दिली आहे

Elon Musk Twitter

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा एलॉन मस्कने दिला आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने ४४ अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनी बनावट युजर्सच्या खात्यांचा डेटा लपवत असल्याचा आरोप करून हा करार रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Elon Musk Warns Of Dropping Twitter Deal If Data Not Provided)

एलॉन मस्कने ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ४४ अब्ज डॉलरमध्ये हा करार झाला. दरम्यान, हा करार एलॉन मस्क यांनी होल्डवर ठेवला. मात्र, ट्विटरने याकडे दुर्लक्ष केलं. बनावट युजर्सच्या खात्यांची माहिती पुरवल्यास हा करार पूर्ण केला जाईल असं एलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. मात्र, ट्विटरने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे एलॉन मस्क यांनी ट्विटरला पत्र लिहून करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचाElon Musk : सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये एलॉन मस्क पहिल्या स्थानावर, तर नाडेला सातव्या क्रमांकावर; मस्क यांची संपत्ती किती?

विलीनीकरण करारांतर्गत ट्विटरने त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पारदर्शकपणे पालन करण्यास नकार दिला आहे. तसेच, बनावट युजर्सचा डेटाही पुरवला जात नाही, अशी तक्रार मस्क यांनी पत्राद्वारे केली आहे.


तसेच, मस्क यांच्या वकिलांनीही पत्रात म्हटलं आहे की, विलीनीकरणाआधी मस्क यांनी मागितलेला डेटा मिळणे हा त्यांचा अधिकारी आहे. ज्यामुळे ते ट्विटर करार करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतील.