घरटेक-वेकApple ने लाँच केला 128 GB RAM चा Mac Studio; जाणून घ्या...

Apple ने लाँच केला 128 GB RAM चा Mac Studio; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

अॅपलने (Apple) 8 मार्चच्या एका इवेन्टमध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केली आहेत. स्वस्त iPhone सोबतच Apple ने आपला पॉवरफुल कॉम्प्युटर म्हणजेच Mac Studio देखील लॉन्च केला आहे. चांगला परफॉर्मेंस हवा असणाऱ्यांसाठी हा नवीन डिव्हाइस प्रोफेशनल्स आहे. मॅक स्टुडिओसह (Mac Studio) ब्रँडने स्टुडिओ डिस्प्ले देखील लॉन्च केला आहे.

मॅक स्टुडिओ (Mac Studio) दमदार फिचर्ससह येतो. हे डिव्हाईज M1 चिपसेटसह Mac Mini च्या वर आहे आणि सध्याच्या Intel बेस्ड Mac Pro पेक्षाही चांगले आहे. कंपनीने यामध्ये M1 Max आणि M1 Ultra प्रोसेसरचं ऑप्शन दिलं आहे. दोन्ही प्रोसेसरसह भिन्न रॅम आणि स्टोरेज कॉन्फिग्रेशन उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्याच्या खास गोष्टी.

- Advertisement -

अॅपलने (Apple) Mac Studio च्या दोन प्रोसेसर व्हेरियंटमध्ये लॉन्च केल्या आहे. त्याच्या M1 Max प्रोसेसर, 32GB RAM आणि 512GB SSD सह बेस व्हेरिएंटची किंमत 1,89,900 रुपये आहे. त्याच वेळी, M1 Ultra प्रोसेसर व्हेरिएंटची किंमत 3,89,900 रुपयांपासून सुरू होते, जी 64GB RAM आणि 1TB SSD सह येते.

पॉवरफुल कॉम्प्युटरचा टॉप व्हेरिएंट 7,89,900 रुपयांना मिळतो. Apple Studio Display ची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत डिव्हाइसच्या स्टँडर्ड ग्लास व्हेरिएंटची आहे. त्याचवेळी, त्याचे नॅनो-टेक्स्चर ग्लास व्हेरिएंट 1,89,900 रुपयांना मिळते.

- Advertisement -

Apple च्या Mac Studio चा आकार Mac Pro च्या तुलनेत लहान आहे. बऱ्यात प्रमाणात, हे डिव्हाईज Mac Mini सारखे दिसते, परंतु त्याची उंची अधिक आहे. यात USB टाइप-सी पोर्ट किंवा थंडरबोल्ट पोर्ट्स आणि समोरच्या बाजूला SDXC कार्ड स्लॉट आहे. तुम्हाला मागील बाजूस अनेक पोर्ट्स देखील मिळतात.

यामध्ये तुम्ही 10GB Ethernet, HDMI, Thunderbolt 4 आणि दोन USB-A पोर्ट जोडू शकता. तसेच डिव्हाईमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. Mac Studio मध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth 5 कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 32GB RAM, 64GB RAM आणि 128GB RAM चे ऑप्शन मिळते.

हा डिव्हाईस 512 GB SSD सह येतो. M1 Ultra प्रोसेसरला 20 CPU Core आणि 64 GPU Core मिळतात, जे 12GB पर्यंत RAM आणि 8TB पर्यंत SSD स्टोरेजला सपोर्ट करतात. डिव्हाइसच्या टॉप कॉन्फिगरेशनमध्ये M1 Ultra प्रोसेसर, 128GB RAM आणि 8TB पर्यंत स्टोरेज दिले आहे, ज्याची किंमत 7,89,900 रुपये आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -