Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग, इंटरचेंज शुल्क १५ वरून १७...

आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग, इंटरचेंज शुल्क १५ वरून १७ रुपये

नवे नियम १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार

Related Story

- Advertisement -

ग्राहकांना ATMमधून पैसे काढणे महाग पडणार आहे. ATM मधून पैसे काढण्याची फ्रि लिमिट संपल्यानंतर RBIकडून घेण्यात येणारे कस्टम चार्जसमध्ये वाढ करण्यात आली आहे. RBIने १० जून २०२१ पासून दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्याच्या ATM इंटरचेंजमध्ये १५ रुपयांवरुन १७ रुपये इतकी वाढ केली आहे. हे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याची मुदत संपल्यानंतर जास्त पैसे आकारले जातील. (expensive to withdraw money from ATM, interchange fee from 15 to 17 rupees)  त्याचप्रमाणे आपल्याच बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा संपल्यावर प्रत्येक व्यवहारानंतर आता २१ रुपये चार्ज लावण्यात येणार आहे. आधी हा चार्च २० रुपये इतका होता. हे नवीन नियम कॅश रिसाइक्लर मशीनसाठी ही लागू असणार आहेत. १ जानेवारी २०२२पासून हे नवीन नियम लागू करणार असल्याचे RBIकडून सांगण्यात आले आहे.

इंटरचेंज फी म्हणजे काय?

बँकेचा एक ग्राहक जर आपल्या ATM कार्डचा वापर करुन दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढत असेल तर आपल्या बँकेला दुसऱ्या बँकेला एक विशिष्ट फी भरावी लागते त्यालाच ATM इंटरचेंज फी असे म्हणतात. अनेक वर्षांपासून खासगी बँका आणि व्हाईट लेबल ATM ऑपरेटर इंटरचेंज फी १५ रुपयांवरुन १८ रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत.

 RBIने इंटरचेंज फी का वाढवली?

- Advertisement -

ऑगस्ट २०१२ रोजी शेवटचे एटीएम इंटरचेंज फी बदलण्यात आली होती. त्यानंतर त्यात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्याचवेळी ऑगस्ट २०१४मध्ये ग्राहकांना लागू केलेल्या कर्जात बदल करण्यात आला. समितीच्या शिफारसी तपासल्यानंतर आता इंटरचेंज फी आणि ग्राहक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक आणि एटीएम ऑपरेटरवरील एटीएम खर्च आणि त्याचा देखभाल खर्च त्याचबरोबर सर्व भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे RBIने म्हटले आहे.


हेही वाचा – तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करतंय का? कसं ओळखाल?

- Advertisement -

 

- Advertisement -