घरटेक-वेकफेसबुकने लहान मुलींना फ्रेंड सजेशनमध्ये दाखवले नग्न पुरुष

फेसबुकने लहान मुलींना फ्रेंड सजेशनमध्ये दाखवले नग्न पुरुष

Subscribe

फेसबूकवर किशोरवयीन मुलींना 'फ्रेंड सजेशन' म्हणून नग्न मध्यम वयोगटातील पुरुष दाखवल्याबद्दल आता रोष व्यक्त केला जात आहे. फेसबुकने यावर दिलगीरी व्यक्त केली असून यापुढे असे होणार नाही, याबद्दल तयारी केली असल्याचे सांगितले.

फेसबूकवर किशोरवयीन मुलींना ‘फ्रेंड सजेशन’ म्हणून मध्यम वयोगटातील नग्न पुरुषांचे फोटो येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. किशोरवयीन मुली ज्या नव्यानेच फेसबूक या सोशल मीडिया साईटवर येतात, त्यांना कमीतकमी ३०० ‘फ्रेंड सजेशन्स’ येतात. या सजेशन्समध्ये बहुतेक मध्यम वयोगटातील पुरुषांचा समावेश असतो. हे पुरूष त्यांच्या प्रोफाइल फोटो मध्ये ‘टॉपलेस’ असतात, असा आरोप काही मुलींनी केला आहे. फेसबुकने यावर खुलासा करताना म्हटले आहे की, मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे खास नियमावली आहे. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी मुलां-मुलीं बरोबर खोटी मैत्री करून त्यांना फसवण्यासाठी फेसबुक वापरणाऱ्या लबाडांना थांबविण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे. तसेच असे फोटो अपलोड करणाऱ्या युजर्सना योग्य इशारा दिला असल्याचेही फेसबुकने सांगितले.

अँडी बर्रोज, एनएसपीसीसी असोसिएट हेड ऑफ चाइल्ड सेफ्टी ऑनलाइन यांनी द सन्डे टेलीग्राफला असे सांगितले आहे की, “फसवणूक करणारे मुलांच्या प्रोफाईल किंवा त्यांच्या मित्रांच्या गटांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मग तिथून ते मुलांना लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा एन्क्रिप्टेड साइटवर घेऊन जातात, जिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे सोपे असते.”

- Advertisement -

सोशल मीडिया अल्गोरिदममुळे मुलांना शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे आणि ‘friend of friend’ किंवा ‘new follower’ शिफारसी अधिक सुलभ केल्यामुळे त्यांच्या विनंत्यांस वैधता मिळू शकते, म्हणूनच या वैशिष्ट्यांना मुलांसाठी ब्लॉक करणे आवश्यक आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

बऱ्याच सोशल नेटवर्क साइट्स मुलांसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि म्हणूनच कठोर आणि परिणामकारक नियम बनवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन मुलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही.”

- Advertisement -

फेसबूकच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, “बाल मनावर परिणाम करणे हे खूपच गंभीर आहे. त्यासाठी आमच्याकडे लहान मुलांच्या सुरक्षितेकरिता खास गट, व्यापक संशोधन आणि बाह्य तज्ज्ञ नेमले गेले आहेत.”

फेसबूक Artificial Intelligence (AI) चा वापर करून सातत्याने अयोग्य संवादाचे प्रकार ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ‘सर्च’ मध्ये मुलांना कसे शोधू शकतो यावर मर्यादा घातली आहे. त्यांना त्यांच्या ओळखीच्या लोकांकडूनच फ्रेन्ड रिक्वेस्ट येतील अशी सोय केलेली आहे. तसेच पोस्ट पब्लिक करण्यापूर्वी लहान मुलांना सावधही केले जाते.

गेल्या महिन्यात फेसबुकने सॉफ्टवेअरच्या मदतीने ८.७ दशलक्ष युजर्सनी बाल नग्नता दर्शवणारे फोटोज काढून टाकले आहेत. मागील वर्षांत मशीन लर्निंग टूल आले. ज्यामुळे नग्नता आणि मुलांचा समावेश असलेल्या प्रतिमांना ओळखून, लैंगिक संदर्भांमध्ये अल्पवयीन मुलांना दर्शविणाऱ्या फोटोंवरील बंदी वाढविण्याची परवानगी दिली आहे. अशाच प्रकारे ही व्यवस्था अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना पकडते, असे कंपनीने त्यांच्या बचावामध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -